आनंददायी शनिवार उपक्रम २०२४-२०२५

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, ठाणे

आनंददायी शनिवार


पार्श्वभूमी 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२०(प्रस्तावना भाग परिच्छेद ४)

1.         १ केवळ शिकणेच महत्वाचे नसून कसे शिकायचे हे शिकणे महत्वाचे

2.         २ तार्किक विचार कसा करायचा व समस्या कश्या सोडवायच्या हे शिकणे महत्वाचे

3.          शिक्षण  सर्व स्तरांवर   अनुभवात्मक ,सर्वसमावेशक ,लवचिक ,

आनंददायी होण्यास अध्यापनशास्त्र विकसित  होण्याची गरज

·       NEP Task क्र ९२

·       शासन परिपत्रक १४ मार्च २०२४

·       मा ,संचालक  महोदय SCERT ,यांच्या सूचना -दि १० एप्रिल २०२४

·       मा आयुक्त (शिक्षण )यांचा आदेश -दि १९ /०४/२०२४

·       SCERT मार्फत शिक्षकांना उपक्रम राबविण्यास मार्गदर्शनासाठी तीपुस्तिका तयार करण्यात आली

·       आनंददायी शनिवार कृतीपुस्तिका परिषदेच्या साईटवर maa.ac.in वर उपलब्ध 

संकल्पना

4.     विविध कौशल्य विकास

5.     आनंददायी अध्ययना तून विकास

6.     विविध कृतींचा समावेश

7.     अभ्यासक्रमाशी संबंधित कृती

8.     प्रत्यक्ष अनुभवातुन अध्ययन

9.     प्रत्येकाच्या  सहभागावर भर 

उद्दिष्ट्ये

१) विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे.

२) विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे.

३) शालेय स्तरावर ताण तणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे.

४) विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे.

५) विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नैराश्यावर मात करण्याची क्षमता विकसित करणे

६) विद्यार्थ्यांची शिक्षणात अभिरुची वाढविणे

७ )विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता संवर्धनासाठी पोषक वातावरण निर्माण करणे

८) विद्यार्थ्यांचे गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी करणे

९ )विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी ,सहकार्य वृत्ती ,नेतृत्व गुण  यांचा विकास करणे

१०) विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्याचा विकास करणे

११)कृषिविषयक आवड व  आदर  निर्माण करणे

१२) लोकसेवा अधिनियमाबाबत जागृती निर्माण करणे

 

कार्यपद्धती

केव्हापासून ?

      या  शैक्षणिक वर्ष२०२४-२०२५ पासून

केव्हा ?

      प्रत्येक शनिवारी

कोणासाठी ?

      राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता ते वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी

अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन आराखडा  कसा असेल ?

      शिक्षक कृती

      विद्यार्थी कृती

वार्षिक नियोजन  नमुना आराखडा

अ क्र

महिना

आठवडा

उपक्रमाचे नाव

पूर्व

नियोजन

विकसित होणारी कौशल्ये

आवश्यक साहित्य

अंमल बजावणी दरम्यान शिक्षक  कृती

अंमल बजावणी दरम्यान विद्यार्थी   कृती

संदर्भ

 

 

 

अंमल बजावणी करताना प्रत्येक घटकाची  जबाबदारी 

      शाळेचे मुख्याध्यापक -

1.     शिक्षकांना मार्गदर्शन व प्रोत्साहन द्यावे

2.     आवश्यक भौतिक  आर्थिक संसाध्नाची उपलब्धता करून द्यावी

      विषय शिक्षक -

1.     उपक्रमाचे सूक्ष्म नियोजन करावे

2.     अभास्क्रमाशी निगडीत उपक्रमाचे आयोजन करावे

3.     सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून सहभाग घ्यावा

4.     विद्यार्थ्यांचे निरीक्षण करून कौशल्य प्राप्तीबद्दल मूल्यमापन करावे

      विद्यार्थी

1.     सक्रीय सहभाग घ्यावा

      पालक -

1.     कृतीसाठी  पाल्यांना प्रोत्साहन द्यावे

2.     योग्य वेळी स्वतः सहभाग घ्यावा

      समुदाय -

       आवश्यकतेनुसार  संसाधने भौतिक ,मनुष्यबळ स्वरुपात मदत उपलब्ध करून द्यावे 

 

लक्षात  ठेवायच्या  महत्वाच्या गोष्टी

      आनंददायी शनिवार उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन करावे

      मुख्याध्यापकांनी आवश्यक तेथे सहाय्य उपलब्ध करून द्यावे

       शाळेतील सर्व शिक्षकांनी उपक्रमात सहभागी व्हावे

      उपक्रमात आवश्यक तेथे पालक ,समुदाय यांचा सहभाग घ्यावा

       प्रत्येक उपक्रमातून विद्यार्थ्यांना -जीवन कौशल्य /लोकशाही मुल्ये /व्यावहारिक कौशल्ये /अभास्क्रमातील कौशल्ये प्राप्त होतील याप्रमाणे नियोजन करावे

      स्थानिक परिस्थितीनुसार नियोजन करावे

       दिव्यांग विद्यार्थ्यांना सहभागी करण्यास  आवश्यकतेप्रमाणे  सहाय्य उपलब्ध करून द्यावे

कार्यपद्धती  आराखडा  

1.     उपक्रमाचे नाव

2.     पूर्व नियोजन

3.     विकसित होणारी कौशल्ये

4.     आवश्यक साधनसामग्री

5.     अंमलबजावणी दरम्यानच्या शिक्षक कृती

6.     अंमलबजावणी दरम्यानच्या  विद्यार्थी कृती 

7.     संदर्भ

 

उपक्रमासाठी  कृती 

·       प्राणायाम /योग/ध्यानधारणा/श्वसनाची तंत्रे

·       आपत्ती व्यवस्थापनाची मूळ तत्वे व्यावहारिक प्रशिक्षण

·       दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन, व्यावहारिक कौशल्ये.

·       स्वतःच्या आरोग्य रक्षणासाठी उपाय योजना, आहाराच्या सवयी.

·       रस्ते सुरक्षा

·       समस्या निराकारणाची तंत्रे

·       कृती, खेळ यावर आधारित उपक्रम

·       Mindfulness वर आधारित कृती उपक्रम

·       नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य.

·       सामाजिक बांधिलकी.

·       निरनिराळ्या व्यवसायांची प्राथमिक माहिती. 

     

वरील कृतीसोबत इतर तत्सम प्रकारच्या नाविन्यपूर्ण कृतींचे नियोजन करता येईल

 

वैशिष्ट्ये 

·       राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये नमूद  सूचनेनुसार इयत्ता ते वी साठी दप्तराविना दहा दिवस शाळा या उपक्रमाचा अनिवार्यपणे  समावेश 

·       कृषी व्यवसायाबाबत आवड निर्माण होण्यासाठी उपक्रमांचा समावेश

·       सदर उपक्रम अंमलबजावणी संनियंत्रण करण्यासाठी पर्यवेक्षीय यंत्रणेच्या शाळांना भेटी

·       सदर भेटीबाबत माहितीचे लिंकद्वारे संकलन

 

SCERT Ananaddahi  Shaniwar  PDF Book


download

 


Shasan Nirnay GR


download

No comments:

Post a Comment

Thanks For Ur Comment