शासन निर्णय | पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीव्दारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पार दर्शिक पध्दती विहीत करण्याबाबत.


 महाराष्ट्र शासन 

(शालेय शिक्षण व क्रीडा विभाग)

दिनांक  : १७ /०२/ २०१९

विषय : पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीव्दारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पार दर्शिक  पध्दती विहीत करण्याबाबत.

 शासन निर्णय :-

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या /खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशत: अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एड कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकाची भरती "अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी" यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर करण्यात येईल. मात्र खाजगी शैक्षणिक संस्था अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीतील उच्चत्तम गुण प्राप्त उमेदवारांपैकी शिक्षण सेवकांची अंतिम निवड मुलाखतीच्या आधारे करील .


GR Karne Ke Liye Yaha Click Kare

No comments:

Post a Comment

Thanks For Ur Comment