TET प्रवाह चित्र


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०१९
ऑनलाईन अर्ज भरण्याचा कृती ओघ तक्ता (Flow Chart)

) www.mahatet.in संकेतस्थळावर भेट देणे.

) संकेतस्थळावरील MAHATET परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती, शासन निर्णय परिपत्रके, परीक्षेचा आराखडा अभ्यासक्रम, वेळापत्रक, परीक्षेस प्रविष्ट होण्याच्या अटी शर्ती, आवश्यक प्रमाणपत्रे, परीक्षा शुल्क इतर माहितीचे बारकाईने वाचन करावे.

) सर्व माहितीचे अवलोकन केल्यानंतरच होमपेज वरीलनवीन नोंदणीया बटनावर क्लिक करा.

) नोंदणी विषयी सूचना काळजीपूर्वक वाचून सूचनांच्या तळाशी असलेले चेकबॉक्स (Checkbox ) वर क्लिक केल्यानंतरचनवीन नोंदणीया बटनावर क्लिक करा.

) उघडलेल्या ऑनलाईन नोंदणी अर्जात दर्शवलेली माहिती प्रथम नाव, वडिलांचे नाव, आडनाव, जन्म दिनांक (एस.एस. सी. प्रमाणपत्राप्रमाणे), लिंग, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी अचूकपणे भरा.

) नोंदणी अर्जात नमूद केलेल्या -मेल मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेल्या SMS मधील TET Resgistration ID Password द्वारे Login करा.

) उघडलेल्या ऑनलाईन अर्जात दर्शविलेली माहिती अचूकपणे भरा, तसेच आपला नवीनतम फोटो आणि स्वाक्षरीची इमेज अपलोड करा. माहिती अचूकपणे भरल्यानंतर "Save & Preview" या बटनावर क्लीक करा.

) भरलेल्या अर्जातील माहिती पाहण्यासाठी Preview या बटनावर वर क्लिक करा. स्क्रीनवर आलेली माहिती अचूक असल्याची खात्री करा.

) Preview मध्ये काही बदल करावयाचा असल्यास Edit बटणाचा वापर करून बदल करू शकता. भरलेल्या माहितीची खात्री झाल्यास सबमिट (Submit ) या बटनावर क्लिक करा. (शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्रामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.)

१०) PAYMENT च्या पेज वर गेल्यानंतर MAKE PAYMENT या बटणाचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट/ डेबिट कार्ड . द्वारे ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरावे लागेल. (चलनाद्वारे ऑफलाईन शुल्क भरता येणार नाही.)

११) शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्राची प्रिंट विहित मुदतीत घेऊन अर्जदाराने जतन करून ठेवावी त्याकरिता Preview / Print या टॅब चा वापर करावा. तसेच Transaction History या टॅब वर क्लिक करून झालेल्या Transaction ची माहिती पाहता येइल.

१२) आवेदनपत्राची एक प्रत तुमच्या माहितीसाठी स्वतःजवळ जतन करून ठेवावी.

No comments:

Post a Comment

Thanks For Ur Comment