संकलित मूल्यमापन -२ (PAT-३) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविण्या करिता मुदतवाढ देणेबाबत

 जा.क्र. राशैसंप्रपम / मूल्यमापन/संकलित मूल्यमापन २-VSK/२०२३-२४/०२२०९ 

दि.२६ एप्रिल २०२४ 

प्रति,

१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जि.प. (सर्व),

२) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, मनपा,

३) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम),

४) प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न. प. (सर्व),

विषय : संकलित मूल्यमापन -२ (PAT-३) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविण्या करिता मुदतवाढ देणेबाबत

संदर्भ : १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/पायाभूत चाचणी/२०२३-२४/३६७५, दि.८ ऑगस्ट २०२३

२. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/पायाभूत चाचणी-VSK/२०२३-२४/४३४५ दि.१३ सप्टेंबर २०२३

३. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/संकलित मूल्यमापन-२-VSK/२०२३-२४/२०२४ दि.८ एप्रिल २०२४

उपरोक्त विषयान्वये STARS प्रकल्पामधील SIG-२ limproved Learning Assessment System नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे आयोजन करण्यात आलेले होते. उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे आयोजन दि. ४ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन-२ घेण्यात आलेले आहे. सदर संकलित मूल्यमापन -२ (PAT-३) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यु- ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत. विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन २ (PAT-३) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन २(PAT-३) चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक

यापूर्वी सोबत देण्यात आलेली आहे. तसेच PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे प्रशिक्षण दि.१५ एप्रिल २०२४ रोजी यु-ट्युबद्वारे शिक्षकांना देण्यात आलेले आहे. यापूर्वी शिक्षकांना संकलित मूल्यमापन - २ (PAT- ३) चे गुण दि.१५ एप्रिल ते २६ एप्रिल २०२४ पर्यंत PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणे करिता कालावधी देण्यात आलेला होता. तथापि सदरची माहिती अद्याप पूर्ण झाली नसल्याने सदरचे गुण चाटबॉटवर नोंदविण्याकरिता जिल्ह्यांना दि.५ मे २०२४ पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे. उपरोक्त कामासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल. त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्हातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन - २ (PAT-३) घेण्यात आलेली आहे. अशा इयत्ता तिसरी ते आठवीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर (https://forms.gle/9ssWv4bu5QPCq6XHA) प्रतिसाद नोंदवावा. तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे.


यु-ट्यूब लाईव्ह लिंक (शिक्षकांसाठी मार्गदर्शन)

https://youtube.com/live/xnnTpdMylxY?feature=share

PAT-३ चाटबॉट मार्गदर्शिका :

https://drive.google.com/file/d/1xXdh5HCmEsB5RI_QhbVlj2D7qQqW5Zj6/view?usp=sharing 

संकलित मूल्यमापन २ गुणांची नोंद करणेसाठी लिंक - २ (PAT-३)

https://cgweb.page.link/HhMEqoqKD43dnJdV7


(शरद गोसावी)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व 

प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.


प्रत माहितीस्तव सविनय सादर:-

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.

२. मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.

३. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

प्रत उचित कार्यवाहीस्तव :

१. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. (सर्व).

२. मा. आयुक्त, महानगरपालिका (सर्व).

३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)




राज्य शासनाच्या मोफत गणवेश बुट व पायमोजे योजनेचा लाभ देण्याबाबत.

 प्रति,

१. शिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद, सर्व

२. प्रशासनाधिकारी, महानगरपालिका, अहमदनगर, अकोला, अमरावती, संभाजीनगर, धुळे, जळगाव, नागपूर, नांदेड वाघाळा, नाशिक, मालेगाव, सांगली मिरज, सोलापूर, ठाणे, भिवंडी निजामपूर.

विषय : राज्य शासनाच्या मोफत गणवेश बुट व पायमोजे योजनेचा लाभ देण्याबाबत.

संदर्भ :१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. एसएसए-१२१४/ प्र.क्र.५०/एस.डी.३ दि.०६ जुले, २०२३

२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. एसएसए-१२१४/ प्र.क्र.०४/एस.डी.३ दि.१६ जानेवारी, २०२४

३) अवर सचिव, एसडी-३, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र क्र. एसएसए-२०२४/प्र.क्र.०४/एसडी-३ दि.१०/०४/२०२४.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून शासकीय तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ. १ ली ते ८ वी मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ शालेय व्यवस्थापन समितीमार्फत देण्याची नवीन योजना शासनाने सुरु केली आहे.

त्याअनुषंगाने दि.०६ जुलै, २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. प्रस्तुत योजनेंतर्गत एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे याकरिता प्रति लाभार्थी विद्यार्थी रु.१७०/- असा दर निश्चित करण्यात आला आहे. तसेच, सदर योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे बुट एक समान दर्जाचे असण्याकरिता शासनाने दि.१६ जानेवारी, २०२४ रोजीच्यापरिपत्रकान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. सदर मार्गदर्शक सूचनांनुसार शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ मध्ये बुट व पायमोजे यांचा लाभ शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार आवश्यक ती पुढील कार्यवाही विहित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे.

याकरिता संदर्भाधिन शासन निर्णय दि.०६ जुलै, २०२३ व शासन परिपत्रक दि.१६ जानेवारी, २०२४ नुसार शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत आवश्यक ती कार्यवाही होणे आवश्यक असल्याने शाळा व्यवस्थापन समितींना सूचना आपल्या स्तरावरुन देण्यात याव्यात.

(प्रदीपकुमार डांगे, भा.प्र.से.) 

राज्य प्रकल्प संचालक 

म.प्रा.शि.प., मुंबई.


प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत Annual Data Entry आणि MIS data entry संदर्भातील करावयाच्या कामकाज संदर्भात...

 प्रति,

१. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व

विषय :- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत Annual Data Entry आणि MIS data entry संदर्भातील करावयाच्या कामकाज संदर्भात...

संदर्भ :- डॉ. सबा अख्तर, एनआयसी दिल्ली यांचेकडील संदेश दि. २३.०४.२०२४.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येतो. योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या खालील दोन विविध पोर्टलवर शाळा, तालुक्यांना माहिती भरणे आवश्यक आहे.

1.pmposhan-mis.education.gov.in

2.education.maharashtra.gov.in

उक्त नमूद दोन पोर्टलवर शाळा व तालुक्यांनी खालील माहिती भरणे अनिवार्य आहे.

अ. Annual Data Entry

आ. Monthly Data Entry

इ. MDM daily attendance

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता योजनेस पात्र प्रत्येक शाळेची एम. आय. एस पोर्टलवर Annual Data Entry बाबत माहितीचा नमुना शाळांकडून अचूकपणे भरून घेऊन दि. ३०.०४.२०२४ पर्यंत पोर्टलवर अद्यावत करावयाचा आहे. याव्यतिरिक्त प्रत्येक महिन्याच्या अखेरीस पोर्टलवर भरावयाचा मंथली एमआयएस डाटा संबंधित महिन्याच्या पुढील महिन्यातील दि. ०५ पर्यंत अद्यावत करावयाचा आहे. माहे एप्रिल, २०२४ करीताचा मंथली एमआयएस डाटादि. ०५.०५.२०२४ पर्यंत पोर्टलवर अद्यावत करण्यात यावा, तद्नंतर सदरची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार नाही, याबाबत केंद्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत. सबब सर्व शिक्षणाधिकारी व लेखाधिकारी पीएमपोषण यांना निर्देशित करण्यात येते की, आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांची Annual Data Entry monthly mis data entry त्वरीत पूर्ण करुन घ्यावी व विहित दिनांकाच्या आत सर्व ऑनलाईन कामकाज पूर्ण होईल याकरीता आवश्यक ते निर्देश सर्व तालुक्यांना निर्गमित करणेत यावेत तसेच प्रस्तुत बाबत उचित सनियंत्रण करुन विहित कालमर्यादेत सर्व कामकाज पूर्ण करुन घ्यावे.

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक)

प्रत माहितीस्तव सादर मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई यांना



राज्यातील जाहिर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देणेबाबत.

 जा.क्र. प्राशिसं/पीएम-पोषण/ २०२३-२४/०३२१७

दि. २२/०४/२०२४

प्रति,

शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, नंदुरबार, धुळे, जळगांव, बुलढाणा, जालना, छ. संभाजीनगर, नाशिक, पुणे, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर व सांगली.

विषयः- राज्यातील जाहिर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देणेबाबत.

संदर्भ:- १. शासन निर्णय क्र. एसवीवाय-२०२३/प्र.क्र.३७/म-७, दिनांक ३१/१०/२०२३.

राज्यातील तालुक्यांमध्ये माहे जून ते सप्टेंबर कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पीकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन या घटकांनी प्रभावित झालेल्या १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांमध्ये संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयाद्वारे दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती घोषित केलेल्या भागाकरीता शासनाने विविध सवलती लागू केलेल्या आहेत.

संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. १० मध्ये नमूद केल्यानुसार दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यामधील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना (पीएम-पोषण योजना) दिर्घ सुट्टीच्या कालावधीत देखील राबविण्यात यावी. उक्त शासन निर्णयान्वये शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त भागामध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात.

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) 

महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रत माहितीस्तव सविनय सादर- मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.




१७ जूनला बकरी ईद (ईद-उल-जुहा) असल्यामुळे राज्यातील उर्दू माध्यम प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ दि.२० जुन २०२४ पासून सुरु करणेबाबत

 क्रमांक: शिआका/२०२४/संघटना निवेदन/आस्था क माध्य/ दिनांक : १९.०४.२०२४

प्रति 

मा. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

मा. शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

विषय : १७ जूनला बकरी ईद (ईद-उल-जुहा) असल्यामुळे राज्यातील उर्दू माध्यम प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ दि.२० जुन २०२४ पासून सुरु करणेबाबत

संदर्भ : श्री. साजिद निसार अहमद, राज्य सरचिटणीस, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ यांचे क्र.अ.भ.उ.शि.सं./स.क्र./शैक्षणिक वर्ष २०२४/१२९

महोदय,

उपरोक्त विषयी संदर्भाधीन निवेदन कृपया अवलोकन व्हावे. (सोबत प्रत संलग्न)

सदर निवेदनातील मागणीबाबत प्रचलित शासन निर्णय / धोरणानुसार यथानियम कार्यवाही करुन संबंधितांना कळविण्यात यावे.


 (रजनी रावडे)

प्रशासन अधिकारी (आस्थापना) 

शिक्षण आयुक्तालय, पुणे

प्रत: श्री. साजिद निसार अहमद, राज्य सरचिटणीस, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, प्लॉट नं.१९, स.नं.१५७, मुस्लिमपूरा, मालेगाव-४२३२०३, नाशिक