सन 2021-22 च्या इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा बाबत.

Covid-19 चा प्रादुर्भाव मार्च 2021 पासून राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याने अनुभवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची तसेच संदर्भातील सर्व घटकांचे लक्षात घेऊन मा. मंत्रिमंडळाचे खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

1. समाईक प्रवेश परीक्षा सीईटी आयोजित करण्यासाठी आयुक्त( शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येत आहे त्यांची रचना खालील प्रमाणे राहील.

1. आयुक्त( शिक्षण) - अध्यक्ष

2. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ - सदस्य

3. संचालक( राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद) - सदस्य

4. संचालक (बालभारती) - सदस्य

5. आयुक्त, परिक्षा परिषद - सदस्य

6. संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) - सदस्य - सचिव

2. इयत्ता 11 वी प्रवेशासाठी घेण्यात येणारे समाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळांशी असलेले सर्व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये प्रवेश घेऊ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व मंडळाच्या (राज्य मंडळ, सीबीएससी, सी आय एसी सी इ, सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे, इत्यादी) विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येईल.

3. इयत्ता अकरावी प्रवेश समाईक प्रवेश परीक्षा ही विद्यार्थ्यासाठी पूर्णता ऐच्छिक असेल. 

4. समाईक प्रवेश परिक्षा राज्य मंडळाच्या इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या विषयावर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असतील. परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे( मल्टिपल चॉइस ऑप्शन टाईप क्वेश्चन) असेल परीक्षा ( O. M. R ) आधारित असेल.

5. सदर समाईक प्रवेश परीक्षा साठी 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका / पेपर असेल व परीक्षेचा कालावधी दोन तासाचा असेल.

6. समाईक प्रवेश परीक्षा, आयुक्त शिक्षण यांच्या देखरेखेखाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ/ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत आयोजित करण्यात येईल. परीक्षेसाठी परीक्षा केंद्राची यादी राज्य मंडळ/ परीक्षा परिषदेमार्फत घोषित करण्यात येईल.

7. इयत्ता 11 वी प्रवेशासाठी समाईक प्रवेश परीक्षा ही परीक्षा विद्यार्थ्यासाठी पूर्णत: ऐच्छिक असल्याने, याचा दहावीचा निकाल लागल्यानंतर राज्य मंडळ / परीक्षा परिषदमार्फत पोर्टलवर विद्यार्थ्यासाठी परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी पर्याय (Option) उपलब्ध करून देण्यात येईल.

8. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या राज्य मंडळाचे विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी परीक्षेसाठी परीक्षा शुल्क अदा केलेले असल्याने विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षा साठी शुल्क भरावे लागणार नाही.

तथापि सी बी एस ई , सी आय एस सी इ, सर्व आंतरराष्ट्रीय मंडळी इत्यादी अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षा साठी राज्य मंडळाकडून/ परीक्षा परिषद कडून विहित करण्यात येणाऱ्या शुल्क अदा करावे लागेल.

9. इयत्ता दहावीच्या निकाल साधारण: 15 जुलाई दरम्यान घोषित होण्याची अपेक्षा आहे. सामाईक प्रवेश परीक्षा इयत्ता दहावीच्या निकालानंतर दोन आठवड्यामध्ये( सुमारे जुलाई महिन्याच्या अखेर अथवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात) आयोजित करण्यात येईल समाईक प्रवेश परीक्षा साठी प्रविष्ट होऊन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरू करावी.

इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना समाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये प्राधान्य देण्यात येईल . म्हणजेच इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर कनिष्ठ महाविद्यालय मध्ये रिक्त राहिलेल्या उर्वरित जागाच्या विद्यार्थ्यांनी सामायिक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यासाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या इयत्ता दहावीच्या मूल्यमापन पद्धती नुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतील.


No comments:

Post a Comment

Thanks For Ur Comment