Pages

TET

Pavitra Portal & TAIT

CTET

Bridge Course 2023-2024

Bridge Course 2022-2023

Bridge Course 2021-22

Shalarth

MPSC & UPSC

WorkBook & Digest

Question Papers

Educational Information

5th & 8th Scholarship Exam

Speeches

Islamic Information

Maharashtra State

Educational Info

All About

SHALARTH

शालार्थ वेतन प्रणाली   (कृती  आणि  शंका  समाधान  )

           जानेवारी २०१८ पासुन तांत्रिक अडचणिंमूळे बंद असलेले शालार्थ वेतन प्रणाली वरील कामकाज आज दिनांक २४ एप्रिल २०१९ पासुन पुन्हा सुरू झालेले आहे


या URL वर गेले असता आपण Shalarth Login Page वर पोहचू शकाल.
त्याठिकाणी आपणांस User Name म्हणून आपल्या शाळेचा शालार्थ DDO CODE क्रमांक द्यायचा आहे 

त्यासोबत त्यास _AST लावायला विसरू नका हं 
उदा:- माझ्या शाळेचा DDO CODE आहे.
02121999999_AST
अन त्याचा प्रथम Login करतेवेळी 
टीप : प्रथम Login केल्यानंतर लगेचच  आपल्या शाळेचा पासवर्ड Home Page वरील Change Password (उजव्या हाताच्या वरील कोपऱ्यात ) या ठिकाणाहून बदल करून घ्यावा

आपली शाळा लॉगिन झाल्यानंतर आपणास काय कृती करायची आहे :- 
सहाव्या वेतन आयोगानुसार तयार केलेल्या  / अदा झालेल्या शेवटच्या  ( माहे मार्च किंवा एप्रिल २०१९ ) ऑफलाईन वेतन देयकातील शिक्षक आपणास शालार्थ वेतन प्रणालीतील शाळेच्या लॉगिन मधील शिक्षकांशी जुळवून घ्यायचे आहेत.

शिक्षक जुळवून घ्यायचे म्हणजे काय
तर, ऑगस्ट २०१७ मधील माहिती आपणास आजरोजी शालार्थ वेतन प्रणालित आपल्या शाळा लॉगिन ला दिसेल.

मात्र ऑगस्ट २०१७ ते मार्च/ एप्रिल २०१९ या दरम्यान विविध प्रकारच्या बदल्या तसेच मयत अथवा सेवा निवृत्ती या यांसारख्या अन्य कारणास्तव शाळेतील कर्मचारी अदलाबदल झाले असतील / कमी-अथवा जास्त झाले असतील तर त्यांना जुळवून घ्यायचे आहे.

म्हणजेच शाळेच्या पटावरील आज दिनांक रोजीचे  कार्यरत शिक्षक आपणांस शालार्थ वेतन प्रणालीत आपल्या शाळेच्या Login ला आणावयाचे आहेत.
त्यासाठी......:- 
) सर्व प्रथम शाळा Login केल्यानंतर आपणांस :-
 Report _Payroll_View Created Post 
          या ठिकाणी शालार्थ वेतन प्रणालीत असलेले आपल्या शाळेतील कर्मचारी यांची यादी पहावयास मिळेल.
          आपल्या माहे मार्च / एप्रिल २०१९ च्या ऑफलाईन वेतन देयका व्यतिरीक्त काही कर्मचारी आपणांस View Created Post या  ठिकाणी पहावयास मिळाले ते कर्मचारी आपल्या शाळेत कार्यरत नसुन ते अन्य शाळेत बदली होउन गेल्याचे आपल्या लक्षात आले असता आपणांस त्या शिक्षकांस आपल्या शाळेतून कार्यमुक्त ( म्हणजेच Detach Relieve ) करावयाचे आहे असे  समजावे.
शिक्षकांस Detach करीत असताना :- 
Worklist_payroll_Organisation Office Profile_Attach Employee To Bill Group मधील Attach Detach Employee
        या मार्गाचा अवलंब करावा सदर बदली होउन गेलेल्या शिक्षकांस आपल्या शाळेच्या Bill Group मधून Detach करून घ्यावे.
           Employee Bill Group मधून Detach झाल्यावर सदर Employee Ddo-2 ( मा. गशिअ ) यांच्या Login ला Relieving साठी उपलब्ध होईल.
DDO-2 ( मा. गशिअ ) यांनी Employee Relieve करण्यासाठी....
Worklist_Payroll_Joining /Relieving Of Employee_Relieving Of Employee 
या ठिकाणी जाउन आलेल्या स्क्रिनवर Display All यावर क्लिक केले असता Bill Group ला Detach केलेले Relieve करण्याजोगे Employee ची Alphabetic List दिसते त्यातील बदली झालेले Employee यांस Relieve करून देणे म्हणजे नविन शाळेत त्यांना Join करता येइल.
तसेच ऑगस्ट २०१७ ते मार्च / एप्रिल २०१९ या कालावधीत आपल्या शाळेत बदली होउन शिक्षक हजर झाले असतील तर त्यांना आपल्या शाळेत Join करून घेण्यासाठी 

सर्व प्रथम DDO-1 ( मुख्याध्यापक ) यांनी :-
संचमान्यते प्रमाणे आपल्या शाळेस मंजूर असलेली पदसंख्या शालार्थ वेतन प्रणालीत उपलब्ध आहे का ? हे पहावे त्यासाठी ....
Report_Payroll_View Created Post
 या ठिकाणी जाऊन संचमान्यतेप्रमाणे पदे उपलब्ध आहेत का? हे पाहून घ्यावे 
रिक्त ( Vacant ) पदे उपलब्ध नसल्यास Ddo-3 (मा. शिक्षणाधिकारी ) यांच्याशी संपर्क साधून Order Master Create Post द्वारे आवश्यक पदाच्या Post Create करून घ्याव्यात 
आवश्यक रिक्त पदे उपलब्ध झाल्याचे निदर्शनास आल्यावर 
Worklist_Payroll_Attach Employee To Bill Group मधील Attach_Detach Vacant Post 
या मार्गाचा वापर करून Vacant Post आपल्या Bill Group ला Attach करून घ्याव्यात त्यानंतरच Ddo-2 ( मा. गशिअ ) यांस संपर्क करून आपल्या शाळेत हजर झालेल्या शिक्षकांची माहिती देउन ( पूर्ण नाव, शालार्थ आय डी, पूर्वीच्या शाळेचे नाव, शाळेत हजर झाल्याची दिनांक, आत्ताच्या शाळेचे नाव Ddo Code, पदनाम . ) Join करण्यास सांगावे 

त्यानंतर DDO-2 ( मा. गशिअ  ) यांनी :-
Worklist_Payroll_Joining/Relieving Of Employee यातील Joining Of Employee 
या मार्गाने जाउन प्राधान्याने शालार्थ आय डी द्वारे Employee Search करावा.
शालार्थ आय डी उपलब्ध नसल्यास Employee Name द्वारे Employee Search करावा मात्र असे करीत असताना Search झालेला Employee हा ज्या शाळेतून कार्यमुक्त झालेला आहे ती शाळा काळजीपूर्वक तपासुन घ्यावी म्हणजे एकाच नावाचा असणारा दुसरा एखादा Employee Attach होण्याची भिती राहणार नाही.
आलेल्या Joining Of Employee च्या स्क्रिनवर आवश्यक ती माहिती भरून Employee Attach करून घ्यावा.
शालार्थ वेतन प्रणालीचे Employee Attach_Detach, Joining_Relieving चे काम दिलेल्या मुदतीत होणेसाठी सर्वानी प्रथम बदली झालेले सर्व कर्मचारी बिल गृप ला डिटॅच करून लगेचच रिलीव्ह करून ठेवावेत म्हणजे विनासायस सर्व प्रक्रिया पार पडेल

तसेच ऑगस्ट २०१७ ते मार्च / एप्रिल २०१९ या कालावधीत
नविन नियुक्ती द्वारे आपल्या शाळेत एखादा कर्मचारी हजर झाला असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळानी ( Ddo-1/ मुख्याध्यापक ) पूर्वीप्रमाणेच आवश्यक कागदपत्रांच्या माहितीवरून

Worklist_Payroll_Employee Configuration Form For Shalarth_New Employee Configuration Form For Shalarth

या मार्गाने जाऊन Employee Configuration Form भरून पुढील Ddo यांच्याकडे पाठवून Approve करून घ्यावा

आपल्या शाळेतील एखादा कर्मचारी ऑगस्ट २०१७ ते मार्च / एप्रिल २०१९ या कालावधीत सेवानिवृत्त / मयत अथवा इतर अन्य कारणाने सेवासमाप्त झाला असल्यास अशा सेवासमाप्त झालेल्या कर्मचाऱ्यांची

Worklist_Payroll_Employee Information_Employee Service End Date

या मार्गाने जाउन आलेल्या फॉर्म वरील सर्व माहिती भरून तो फॉर्म Ddo-2 ( मागशिअ ) यांच्याकडे Approval साठी पाठवावा.
टीप :- कोणत्याही परिस्थितीत सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त ( Service End ) केली जाणार नाही याची दक्षता घ्यावी
ऑगस्ट २०१७ ते मार्च / एप्रिल २०१९ या कालावधीत आपल्या तालुक्यात एखादी नविन शाळा निर्माण झाली असल्यास Ddo-2 (मा. गशिअ ) यांच्या Login मधून 

Worklist_School College Configuration 
या मार्गाचा अवलंब करून आलेल्या फॉर्म मध्ये 
शाळेचा U-Dise Code 
मुख्याध्यापक यांचे नाव 
मुख्याध्यापक यांचा मोबाईल क्रमांक
मुख्याध्यापक यांचा मेल आय डी 
माहिती भरून फॉर्म सबमिट करून घ्यावा.

DDO-3 ( मा. शिक्षणाधिकारी ) यांनी  निर्माण झालेल्या  या नविन शाळेस 
Report System Approval 
या मार्गाचा अवलंब करून Approval द्यावे 
त्यानंतर सदर शाळा Ddo-1 ( मुख्याध्यापक) यांस Login साठी उपलब्ध होईल. मुख्याध्यापक यानी शाळा Login करून 
Worklist_payroll_Organisation Office Profile मधील () Organisation Office Information () Organisation/Office
 हे दोनही फॉर्म वरील माहिती भरून ते ॲपृव्हल साठी Ddo-2 ( मा. गशिअ ) यांच्याकडे पाठवावे.
वरील फॉर्म Ddo-2 ( मा. गशिअ ) यांनी Approve केल्यानंतर 
Ddo-3 ( मा. शिक्षणाधिकारी ) यांनी या शाळेस.....
स्किम द्यावी
ऑर्डर मास्टर करून पोस्ट क्रिएट कराव्यात,
 Department Eligibility द्यावी 
Ddo-1 ( मुख्याध्यापक ) यानी......
Bill Group Maintain करावा 
Bill Group ला Vacant post Attach कराव्यात 
Joining Relieving अथवा New Employee Configuration द्वारे कर्मचारी शाळेस जोडावेत 
कर्मचारी यांस Employee Eligibility द्यावी

वरील सर्व प्रक्रियेद्वारे आपणांस माहे मार्च/ एप्रिल २०१९ चे ऑफलाईन वेतन देयकाची तंतोतंत नोंद शालार्थ वेतन प्रणालीत घ्यावयाची आहे 

सदर काम करीत असताना आपणांस येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आपला शालार्थ शंका समाधान परिवार सदैव तत्पर आहे. चला तर मग दिलेल्या मुदतीत सर्व प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर सातव्या वेतन आयोगासाठी आपली शालार्थ वेतन प्रणाली सज्ज करूया.

कृपया तुम्ही आमच्या ध्येयासाठी थोडी मदत करा आम्ही या वर्षी काही शाळेंना मदत करणार आहोत तरी कृपया फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणनू आर्थिक सहाय्य करा फक्त १० रु जास्त नाही  खालील मदतीच्या हातावर क्लिक करून तुम्ही सहकार्य करू शकतात 


1 comment:

  1. sir,please send me all G.R. If possible.i am dy.CEO In cantonment we face many problems regarding this. thanking you

    ReplyDelete

Thanks For Ur Comment