Pages

TET

Pavitra Portal & TAIT

CTET

Bridge Course 2023-2024

Bridge Course 2022-2023

Bridge Course 2021-22

Shalarth

MPSC & UPSC

WorkBook & Digest

Question Papers

Educational Information

5th & 8th Scholarship Exam

Speeches

Islamic Information

Maharashtra State

Educational Info

All About

शालार्थ : ओळख

शालार्थ : ओळख 

                   शालार्थ प्रणाली ही महाराष्ट्र शासनाने  शालेय शिक्षण विभागाच्या वेतनासंबंधी  एकीकृत वित्तीय प्रबंधन प्रणाली (Integrated Financial Management Service) अंतर्गत TATA CONSULTANCY SERVICES च्या सहायाने शालेय शिक्षण विभागात अंतर्भूत करण्यासाठी विकसित केली आहे.  सर्व कर्मचारी त्यांचे वेतन यांचा एक सामाईक डेटाबेस असावा हा यामागील महत्वाचा हेतू........ "सेवार्थ " या प्रणालीच्या यशानंतर शालार्थचा विकास झाला.  सध्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये  प्रायोगिक तत्वावर हि प्रणाली वापरली जाणार आहे. ठाणे ,पुणे ,लातूर . जिल्ह्यांमध्ये तिच्याविषयी प्रशिक्षणाच्या  माध्यमातून चर्चा सुरु झाल्या आहेत.  ही कागद विरहित वेतन देयक निर्माण करणारी प्रणाली अनेक  दृष्टीने उपयोगी ठरणार आहे.

 फायदे :- 
देयक निर्मिती , देयक प्रस्तुतीकरण ,देयक लेखापरीक्षण ,कर्मचारी वेतन या सर्व गोष्टी     इलेक्ट्रोनिक माध्यमातून होणार आहेत .  
वितीय शिस्त निर्माण होण्यास मदत होणार आहे.
वेतन निश्चित तारखेला मिळेल . प्रत्येक महिन्याच्या  तारखेला मिळणे अपेक्षित आहे.
वेतनाची  लांबलचक चालणारी प्रक्रिया अचूक आणि आटोपशीर होण्यास मदत 
) maker -checker  या तत्वावर हि प्रक्रिया उभी आहे. 
 अचूक देयके निर्माण होतील . 
 वेतनाचा इतिहास अगदी सहज उपलब्ध होईल.
 कर्मचारी महाकोश निर्माण होईल.
कर्मचारी माहिती आणि वेतन TREASURY NET  आणि BEAMS ( BUDGET ESTIMATION  AUTHORIZATION  &  MONITORING  SYSTEM )  या प्रणाली प्रणाली सोबत विनिमित  होईल.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रशासनात अश्या योजना नक्कीच
मैलाचा दगड ठरतील यात शंका नाही...

No comments:

Post a Comment

Thanks For Ur Comment