Pages

TET

Pavitra Portal & TAIT

CTET

Bridge Course 2023-2024

Bridge Course 2022-2023

Bridge Course 2021-22

Shalarth

MPSC & UPSC

WorkBook & Digest

Question Papers

Educational Information

5th & 8th Scholarship Exam

Speeches

Islamic Information

Maharashtra State

Educational Info

All About

शासन निर्णय व परिपत्रक | राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांतील इयत्ता १ ली ते ५ वी च्या शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत

   

 महाराष्ट्र शासन 

(शालेय शिक्षण  व क्रीडा विभाग )

दिनांक  : २७-१२-२०२१

विषय :-   राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांतील इयत्ता १ ली ते ५ वी च्या शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत...

संदर्भ :

१. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे प्रशिक्षण आयोजनाबाबतचे पत्र दि. १३ जुलै, २०२१

२. या कार्यालयाचे दीक्षा अॅप वर नोंदणी करणेबाबतचे पत्र दि. २१ सप्टेंबर प्रशिक्षण,२०२१ व २७ सप्टेंबर २०२१.

३. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम /आय.टी./ NISHTHA प्रशिक्षण / २०२१/३१४३ दि. २७.०९.२०२१

४. शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०२१/प्र.क्र.१७९/एसडी-६ दि.२७.१०.२०२१

५. शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र दि. २२ डिसेंबर, २०२१

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेमार्फत निष्ठा (National Initiatives for School Heads and Teachers Holistic Advancerment) या एकात्मिक प्रशिक्षणाची सुरुवात दिनांक २१ ऑगस्ट, २०१९ रोजी करण्यात आली. यानुसार प्राथमिक स्तरावरील ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रशिक्षण सन   २०२० - २०२१ मध्ये पूर्ण करण्यात आले. सद्यस्थितीमध्ये ऑनलाईन निष्ठा २० प्रशिक्षण हे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी सुरु आहे. सद्यस्थितीमध्ये दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणास सुरुवात करण्यात येत आहे. सद्यस्थितीमध्ये देशातील कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर देशामधील प्राथमिक शाळांमधील इयत्ता १ ली   ते ५ वी च्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठी NISHTHA ३० FLN (National   Initiative For School Head' s and Teachers Holistic Advancement) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात   येत आहे. सदरचे प्रशिक्षण हे राष्ट्रीय स्तरावरून DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये   आयोजित करण्यात येत आहे. सदरच्या प्रशिक्षणामध्ये एकूण १२ घटकसंचांचा (मोड्यूल्स) चा समावेश   असणार आहे. ते खालील प्रमाणे.

READ CIRCULAR 


परिपत्रक   डाऊनलोड करण्यासाठी 
इथे किलिक करा 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रशिक्षण वेळापत्रक

अ.क्र.

कालावधी

कोर्स क्रमांक व नाव

दि. ०१ जानेवारी ते ३० जानेवारी २०२२

१. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची

२. क्षमताधिष्ठीत शिक्षणाकडे वाटचाल.

३. अध्ययनार्थ्यांचे आकलन: मुल कसे शिकते?

४. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानात पालकांचा व समाजाचा सहभाग

दि. ३१ जानेवारी ते १ मार्च, २०२२

६. विद्याप्रवेश आणि बालवाटीकेचे आकलन

७. पायाभूत भाषा आणि साक्षरता,

८. प्राथमिक स्तरावर बहुभाषिक शिक्षण

९. अध्ययन मुल्यांकन

दि. २ मार्च ते ३१ मार्च, २०२२

१०. पायाभूत संख्याज्ञान

११. अध्ययन अध्यापन व मुल्यांकनामध्ये माहिती व तंत्रज्ञाचा वापर

१२. शालेय शिक्षणातील पुढाकार

१३. खेळणीधारित अध्यापनशास्त्र

दि.०१ एप्रिल ते ३० एप्रिल, २०२२

सर्व कोर्स उपलब्ध करून देण्यात येतील या कालावधीमध्ये उर्वरित प्रशिक्षणार्थी यांनी सदरचे कोर्स पूर्ण करावेत.

 



No comments:

Post a Comment

Thanks For Ur Comment