महाराष्ट्र शासन
(शालेय शिक्षण व क्रीडा विभाग )
दिनांक : 29 नोव्हेंबर, 2021
विषय : सन २०१४-१५ पासून प्रलंबित असलेल्या संचमान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत.
राज्यातील खाजगी विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळांचे/तुकडयांचे मुल्यांकनाचे संचालनालय स्तरावर प्राप्त झालेले बरेचसे प्रस्ताव सन २०१८-१९ किंवा तद्नंतर ऑनलाईन संचमान्यता न मिळाल्याने त्रुटीमध्ये दर्शविण्यात आले असल्याची बाब दिसून आली आहे. ब-याचशा शाळांकडून मूल्यांकनास्तव सन २०१८-१९ किंवा तद्नंतर संचमान्यता मिळणेबाबत प्रस्तावही संचालनालयास सादर करण्यात आले आहे. सन २०१८-१९ ऑनलाईन संचमान्यते अभावी मूल्यांकनामध्ये त्रुटीमध्ये दर्शविण्यात आलेल्या शाळांची संख्या मोठया प्रमाणावर दिसून येत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी, संघटना प्रतिनिधी यांचेकडून मूल्यांकनात २०१८-१९ संचमान्यते अभावी त्रुटीत असलेल्या शाळांना संचमान्यता उपलब्ध करून देणेबाबत वारंवार मागणी करण्यात येत आहे. तसेच संचमान्यतेबाबत दि. ११/११/२०२१ रोजी एनआयसी पुणे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्येही सन २०१८-१९ तसेच तद्पूर्वीची ऑनलाईन प्रलंबित संचमान्यतेतील तांत्रिक अडचण दूर करून सदर शाळांना ऑनलाईन संचमान्यता उपलब्ध करून देणेसाठी एनआयसी, पुणे यांचेकडून अवधी लागण्याची शक्यता असल्याचे दिसून आले आहे.
मूल्यांकनामध्ये संचमान्यतेअभावी त्रुटीमध्ये दर्शविण्यात आलेल्या त्रुटींची पूर्तता ही कालमर्यादेत करणे आवश्यक असल्याची बाब विचारात घेता सन २०१८-१९ किंवा तदनंतरच्या संचमान्यतेअभावी मूल्यांकनात त्रुटीमध्ये असलेल्या शाळांना प्रलंबित असलेल्या शैक्षणिक वर्षांची ऑफलाईन संचमान्यता खालील बाबी/सूचनांचे पालन करुन सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक) यांचे स्तरावरुन उपलब्ध करुन देणेबाबतचे निर्देश शिक्षणाधिकारी (माध्यमिक / प्राथमिक) यांना देण्यात येत आहेत. याकरिता पुढील बाबींचे काटेकोर पालन होणे अनिवार्य आहे.
No comments:
Post a Comment
Thanks For Ur Comment