महाराष्ट्र शासन
(शालेय शिक्षण व क्रीडा विभाग )
दिनांक : 29 नोव्हेंबर, 2021
वाचा :-
१) शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०२०/प्र.क्र.८६/एसडी-६, दि. १५ जून, २०२०
२) शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०२०/प्र.क्र.८६/एसडी-६, दि. २४ जून, २०२०
३) शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०२०/प्र.क्र.८६/एसडी-६, दि. २२ जुलै, २०२०
४) शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०२०/प्र.क्र.८६ / एसडी-६, दि. १७ ऑगस्ट, २०२०,
५) शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०२०/प्र.क्र.८६/एसडी-६, दि. २९ ऑक्टोबर, २०२०.
६) शासन परिपत्रक क्र. संकीर्ण२०२१/प्र.क्र.९४/एसडी-६, दि. ०७ जुलै, २०२१.
७) शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०२१/प्र.क्र.११३ / एसडी-६, दि. १० ऑगस्ट, २०२१.
८) शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०२१/प्र.क्र.११३/एसडी-६, दि. २४ सप्टेंबर, २०२१.
९) आरोग्य सेवा संचालनालय, पुणे यांचे पत्र क्रमांक संआसे/कोविड/शाळा सुरु होण्यासंदर्भात सूचना / २५६०२-७१०/२०२१, दि. २८ नोव्हेंबर २०२१
परिपत्रक :
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन परिपत्रक, दि. ७ जुलै २०२१ अन्वये ग्रामीण भागातील कोरोना मुक्त गावात इ. ८ वी ते इ. १२ वीचे दि. १० ऑगस्ट २०२१ अन्वये ग्रामीण भागात इ. ५ वी ते इ.७ वी व शहरी भागातील इ. ८ वी ते इ. १२ वी तसेच दि. २४ सप्टेंबर, २०२१ अन्वये शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा दि.०४ ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. एकुणच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी व महापालिका हद्दीतील इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग दि. ०१ डिसेंबर, २०२१ रोजी पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment
Thanks For Ur Comment