Friday, April 19, 2024

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा शिधा वाटप करणेबाबत.

 दुरध्वनीक्र. (०२०) २६१२८१५७

ई-मेल mdmdep@gmail.com

जा.क्र. प्राशिसं/पीएम-पोषण २०२३-२४/०३१८८ दि. १९/०४/२०२४


प्रति,

१. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई.

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.

विषयः- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा शिधा वाटप करणेबाबत.

संदर्भ:- १. शासन पत्र क्र. संकिर्ण-२०२३/प्र.क्र.१०५/एस.डी.४, दि.१९/०४/२०२४.

२. शिक्षण संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंमा-२४ (जे-०१)/ उन्हाळी सुट्टी/ एस.-१/२२०६, दिनांक १८/०४/२०२४.

३. शिक्षण संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं / ड-३०१/२०२४/३१८४, दिनांक १९/०४/२०२४.

उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्याने त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेतउ पस्थित राहण्यापासून सवलत देणे संदर्भात शासनाने संदर्भिय पत्र क्र. १ मधील मुद्दा क्र. १ नुसार राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २२/०४/२०२४ पासून शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत दिली आहे. संदर्भिय पत्र क्र. २ नुसार संचालनालयाने शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक ०२/०५/२०२४ पासून सुट्टी जाहीर केलेली आहे.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र विद्यार्थ्यांना शासनाने शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत दिलेल्या कालावधीतील कार्यदिनाकरीता नियमानुसार देय असणारा तांदुळ व धान्यादी माल कोरडा शिधा स्वरुपात वाटप करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरुन क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात यावेत. योजनेंतर्गत पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे.

प्रत माहितीस्तव सविनय सादर,

१. मा. सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.

२. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

३. मा. आयुक्त, महानगरपालिका, सर्व.

४. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.

प्रत - आवश्यक त्या कार्यवाहीस्तव-

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, विभाग सर्व.




No comments:

Post a Comment

Thanks For Ur Comment