महाराष्ट्र शासन
(शालेय शिक्षण व क्रीडा विभाग )
दिनांक : ३१-१२-२०२१
विषय :- १०० दिवसांकरिता वाचन अभियान( 100 days Reading Campaign reg. ) राबविणे
संदर्भ :१) मा. सचिव शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र.क्र.D.O.No. 18-91/2021-IS 15. दि.9/12/2021.
(२) मा. राज्य प्रकल्प समन्वयक, तथा सहसंचालक (प्रशासन) म.प्रा.शि.प. मुंबई यांचे जा.क्र. मप्राशिप /सशि / प्रशिक्षण / Reading Campaign/२०२१२२/३७७७ चे दि. १५ डिसेंबर २०२१ चे पत्र.
३) मा. वित्त सल्लागार शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र.क्र (Do.No. 1-7/2019 IS.5(Pi.2) दि.८ डिसेंबर २०२१ चे पत्र.
उपरोक्त विषयाच्या संदर्भाने पायाभूत साक्षरता ही आजीवन शिक्षणाची एक आवश्यक पूर्वअट आहे. पायाभूत साक्षरता प्राप्तीसाठी वाचन सवय ही एक महत्त्वाची बाब आहे, म्हणून जिज्ञासू , कल्पक, उत्साही, आणि सर्जनशील मुलांमध्ये वाचन सवयी विकसित होणे गरजेचे आहे. उपरोक्त विषयानुसार याच दृष्टीकोनातून भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालायातर्फे राज्य सरकारच्या सहाय्याने बालवाटिका ते इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्याकरिता जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२२ या कालावधीत १०० दिवसांकरिता वाचन अभियान (100 days Reading Campaign) राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत १०० दिवसांकरिता या पत्रासोबत आठवडानिहाय उपक्रमांचे नियोजन देण्यात येत आहे. दिलेल्या नियोजनानुसार उपक्रमाची आठवडानिहाय अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. वाचन आनंददायी पद्धतीने होण्याकरिता सदर उपक्रमाची साध्या, सहज व आनंददायी पद्धतीने रचना करण्यात आलेली आहे. या रचनाचे संचलन सुकर होण्याकरिता आवश्यक संदर्भ साहित्य/स्रोत हे शाळा, घर या स्तरावर सहज उपलब्ध होऊ शकेल अशा पद्धतीने देण्यात आलेले आहे तसेच शाळा बंद असण्याच्या स्थितीत करावयाच्याकृतीही देण्यात आल्या आहेत. आवश्यक बदलांबाबतही यात सूचित करण्यात आलेले आहे. तसेच सदर अभियानाच्या अनुषंगाने सहभागी घटकाच्या भूमिका व जबाबदारी या दृष्टीने नार्गदर्शक सूचना ही पत्रासोबत देण्यात येत आहेत.
सदर विषयाच्या अनुषंगाने खालील सूचनांनुसार कार्यवाही करण्यात यावी.
१. १०० दिवसांकरिता बाचन अभियान या कार्यक्रमाची दि. १ जानेवारी पासून सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यात यावी.
२. सर्व पर्यवेक्षक यंत्रणांनी अभियानाच्या जनजागृतीकरिता प्रयत्नशील रहावे.
३. प्रत्येक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेद्वारे सदर कार्यक्रमाच्या गुणवत्तेचे स नियंत्रण करण्याकरिता गोष्टीचा शनिवार या उपक्रमाचे समन्वयक यांना जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात यावे.
४. अभियानातील विविध उपक्रमाबाबत अहवाल तयार करण्यात यावा, तसेच नोडल अधिकारी यांनी अभियानाचे योग्य व्हिडीओ तयार करून तसेच क्षणचित्रे निवडून लिंक मध्ये अपलोड करावेत. या बाबतची लिंक स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल.
५. या पाचन अभियान उपक्रमाच्या सोशल मिडिया वरील प्रसारासाठी पुढील Hashtag वापरण्यात यावा. #100days Reading Campaign #Padhe Bharat, तरी दि. १ जानेवारी २०२२ पासून सोबत जोडलेल्या नियोजनानुसार व सूचनांनुसार आपल्या अधिनस्त सर्व व्यवस्थापनाच्या तसेच सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये अभियानाची योग्य व यशस्वी अंमलबजावणी करण्यात यावी.
सोबत मार्गदर्शक सूचना व आठवडानिहाय उपक्रमांचे नियोजन
READ CIRCULAR
No comments:
Post a Comment
Thanks For Ur Comment