Showing posts with label MH GR. Show all posts
Showing posts with label MH GR. Show all posts

Friday, April 26, 2024

संकलित मूल्यमापन -२ (PAT-३) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविण्या करिता मुदतवाढ देणेबाबत

 जा.क्र. राशैसंप्रपम / मूल्यमापन/संकलित मूल्यमापन २-VSK/२०२३-२४/०२२०९ 

दि.२६ एप्रिल २०२४ 

प्रति,

१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जि.प. (सर्व),

२) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, मनपा,

३) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम),

४) प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न. प. (सर्व),

विषय : संकलित मूल्यमापन -२ (PAT-३) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविण्या करिता मुदतवाढ देणेबाबत

संदर्भ : १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/पायाभूत चाचणी/२०२३-२४/३६७५, दि.८ ऑगस्ट २०२३

२. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/पायाभूत चाचणी-VSK/२०२३-२४/४३४५ दि.१३ सप्टेंबर २०२३

३. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/संकलित मूल्यमापन-२-VSK/२०२३-२४/२०२४ दि.८ एप्रिल २०२४

उपरोक्त विषयान्वये STARS प्रकल्पामधील SIG-२ limproved Learning Assessment System नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे आयोजन करण्यात आलेले होते. उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे आयोजन दि. ४ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन-२ घेण्यात आलेले आहे. सदर संकलित मूल्यमापन -२ (PAT-३) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यु- ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत. विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन २ (PAT-३) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन २(PAT-३) चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक

यापूर्वी सोबत देण्यात आलेली आहे. तसेच PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे प्रशिक्षण दि.१५ एप्रिल २०२४ रोजी यु-ट्युबद्वारे शिक्षकांना देण्यात आलेले आहे. यापूर्वी शिक्षकांना संकलित मूल्यमापन - २ (PAT- ३) चे गुण दि.१५ एप्रिल ते २६ एप्रिल २०२४ पर्यंत PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणे करिता कालावधी देण्यात आलेला होता. तथापि सदरची माहिती अद्याप पूर्ण झाली नसल्याने सदरचे गुण चाटबॉटवर नोंदविण्याकरिता जिल्ह्यांना दि.५ मे २०२४ पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे. उपरोक्त कामासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल. त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्हातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन - २ (PAT-३) घेण्यात आलेली आहे. अशा इयत्ता तिसरी ते आठवीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर (https://forms.gle/9ssWv4bu5QPCq6XHA) प्रतिसाद नोंदवावा. तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे.


यु-ट्यूब लाईव्ह लिंक (शिक्षकांसाठी मार्गदर्शन)

https://youtube.com/live/xnnTpdMylxY?feature=share

PAT-३ चाटबॉट मार्गदर्शिका :

https://drive.google.com/file/d/1xXdh5HCmEsB5RI_QhbVlj2D7qQqW5Zj6/view?usp=sharing 

संकलित मूल्यमापन २ गुणांची नोंद करणेसाठी लिंक - २ (PAT-३)

https://cgweb.page.link/HhMEqoqKD43dnJdV7


(शरद गोसावी)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व 

प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.


प्रत माहितीस्तव सविनय सादर:-

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.

२. मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.

३. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

प्रत उचित कार्यवाहीस्तव :

१. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. (सर्व).

२. मा. आयुक्त, महानगरपालिका (सर्व).

३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)




Thursday, April 25, 2024

राज्य शासनाच्या मोफत गणवेश बुट व पायमोजे योजनेचा लाभ देण्याबाबत.

 प्रति,

१. शिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद, सर्व

२. प्रशासनाधिकारी, महानगरपालिका, अहमदनगर, अकोला, अमरावती, संभाजीनगर, धुळे, जळगाव, नागपूर, नांदेड वाघाळा, नाशिक, मालेगाव, सांगली मिरज, सोलापूर, ठाणे, भिवंडी निजामपूर.

विषय : राज्य शासनाच्या मोफत गणवेश बुट व पायमोजे योजनेचा लाभ देण्याबाबत.

संदर्भ :१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. एसएसए-१२१४/ प्र.क्र.५०/एस.डी.३ दि.०६ जुले, २०२३

२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. एसएसए-१२१४/ प्र.क्र.०४/एस.डी.३ दि.१६ जानेवारी, २०२४

३) अवर सचिव, एसडी-३, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र क्र. एसएसए-२०२४/प्र.क्र.०४/एसडी-३ दि.१०/०४/२०२४.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून शासकीय तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ. १ ली ते ८ वी मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ शालेय व्यवस्थापन समितीमार्फत देण्याची नवीन योजना शासनाने सुरु केली आहे.

त्याअनुषंगाने दि.०६ जुलै, २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. प्रस्तुत योजनेंतर्गत एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे याकरिता प्रति लाभार्थी विद्यार्थी रु.१७०/- असा दर निश्चित करण्यात आला आहे. तसेच, सदर योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे बुट एक समान दर्जाचे असण्याकरिता शासनाने दि.१६ जानेवारी, २०२४ रोजीच्यापरिपत्रकान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. सदर मार्गदर्शक सूचनांनुसार शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ मध्ये बुट व पायमोजे यांचा लाभ शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार आवश्यक ती पुढील कार्यवाही विहित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे.

याकरिता संदर्भाधिन शासन निर्णय दि.०६ जुलै, २०२३ व शासन परिपत्रक दि.१६ जानेवारी, २०२४ नुसार शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत आवश्यक ती कार्यवाही होणे आवश्यक असल्याने शाळा व्यवस्थापन समितींना सूचना आपल्या स्तरावरुन देण्यात याव्यात.

(प्रदीपकुमार डांगे, भा.प्र.से.) 

राज्य प्रकल्प संचालक 

म.प्रा.शि.प., मुंबई.


Wednesday, April 24, 2024

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत Annual Data Entry आणि MIS data entry संदर्भातील करावयाच्या कामकाज संदर्भात...

 प्रति,

१. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व

विषय :- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत Annual Data Entry आणि MIS data entry संदर्भातील करावयाच्या कामकाज संदर्भात...

संदर्भ :- डॉ. सबा अख्तर, एनआयसी दिल्ली यांचेकडील संदेश दि. २३.०४.२०२४.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येतो. योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या खालील दोन विविध पोर्टलवर शाळा, तालुक्यांना माहिती भरणे आवश्यक आहे.

1.pmposhan-mis.education.gov.in

2.education.maharashtra.gov.in

उक्त नमूद दोन पोर्टलवर शाळा व तालुक्यांनी खालील माहिती भरणे अनिवार्य आहे.

अ. Annual Data Entry

आ. Monthly Data Entry

इ. MDM daily attendance

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता योजनेस पात्र प्रत्येक शाळेची एम. आय. एस पोर्टलवर Annual Data Entry बाबत माहितीचा नमुना शाळांकडून अचूकपणे भरून घेऊन दि. ३०.०४.२०२४ पर्यंत पोर्टलवर अद्यावत करावयाचा आहे. याव्यतिरिक्त प्रत्येक महिन्याच्या अखेरीस पोर्टलवर भरावयाचा मंथली एमआयएस डाटा संबंधित महिन्याच्या पुढील महिन्यातील दि. ०५ पर्यंत अद्यावत करावयाचा आहे. माहे एप्रिल, २०२४ करीताचा मंथली एमआयएस डाटादि. ०५.०५.२०२४ पर्यंत पोर्टलवर अद्यावत करण्यात यावा, तद्नंतर सदरची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार नाही, याबाबत केंद्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत. सबब सर्व शिक्षणाधिकारी व लेखाधिकारी पीएमपोषण यांना निर्देशित करण्यात येते की, आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांची Annual Data Entry monthly mis data entry त्वरीत पूर्ण करुन घ्यावी व विहित दिनांकाच्या आत सर्व ऑनलाईन कामकाज पूर्ण होईल याकरीता आवश्यक ते निर्देश सर्व तालुक्यांना निर्गमित करणेत यावेत तसेच प्रस्तुत बाबत उचित सनियंत्रण करुन विहित कालमर्यादेत सर्व कामकाज पूर्ण करुन घ्यावे.

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक)

प्रत माहितीस्तव सादर मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई यांना



Tuesday, April 23, 2024

राज्यातील जाहिर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देणेबाबत.

 जा.क्र. प्राशिसं/पीएम-पोषण/ २०२३-२४/०३२१७

दि. २२/०४/२०२४

प्रति,

शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, नंदुरबार, धुळे, जळगांव, बुलढाणा, जालना, छ. संभाजीनगर, नाशिक, पुणे, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर व सांगली.

विषयः- राज्यातील जाहिर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देणेबाबत.

संदर्भ:- १. शासन निर्णय क्र. एसवीवाय-२०२३/प्र.क्र.३७/म-७, दिनांक ३१/१०/२०२३.

राज्यातील तालुक्यांमध्ये माहे जून ते सप्टेंबर कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पीकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन या घटकांनी प्रभावित झालेल्या १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांमध्ये संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयाद्वारे दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती घोषित केलेल्या भागाकरीता शासनाने विविध सवलती लागू केलेल्या आहेत.

संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. १० मध्ये नमूद केल्यानुसार दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यामधील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना (पीएम-पोषण योजना) दिर्घ सुट्टीच्या कालावधीत देखील राबविण्यात यावी. उक्त शासन निर्णयान्वये शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त भागामध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात.

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) 

महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रत माहितीस्तव सविनय सादर- मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.




Saturday, April 20, 2024

१७ जूनला बकरी ईद (ईद-उल-जुहा) असल्यामुळे राज्यातील उर्दू माध्यम प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ दि.२० जुन २०२४ पासून सुरु करणेबाबत

 क्रमांक: शिआका/२०२४/संघटना निवेदन/आस्था क माध्य/ दिनांक : १९.०४.२०२४

प्रति 

मा. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

मा. शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

विषय : १७ जूनला बकरी ईद (ईद-उल-जुहा) असल्यामुळे राज्यातील उर्दू माध्यम प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ दि.२० जुन २०२४ पासून सुरु करणेबाबत

संदर्भ : श्री. साजिद निसार अहमद, राज्य सरचिटणीस, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ यांचे क्र.अ.भ.उ.शि.सं./स.क्र./शैक्षणिक वर्ष २०२४/१२९

महोदय,

उपरोक्त विषयी संदर्भाधीन निवेदन कृपया अवलोकन व्हावे. (सोबत प्रत संलग्न)

सदर निवेदनातील मागणीबाबत प्रचलित शासन निर्णय / धोरणानुसार यथानियम कार्यवाही करुन संबंधितांना कळविण्यात यावे.


 (रजनी रावडे)

प्रशासन अधिकारी (आस्थापना) 

शिक्षण आयुक्तालय, पुणे

प्रत: श्री. साजिद निसार अहमद, राज्य सरचिटणीस, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, प्लॉट नं.१९, स.नं.१५७, मुस्लिमपूरा, मालेगाव-४२३२०३, नाशिक



Friday, April 19, 2024

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा शिधा वाटप करणेबाबत.

 दुरध्वनीक्र. (०२०) २६१२८१५७

ई-मेल mdmdep@gmail.com

जा.क्र. प्राशिसं/पीएम-पोषण २०२३-२४/०३१८८ दि. १९/०४/२०२४


प्रति,

१. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई.

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.

विषयः- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा शिधा वाटप करणेबाबत.

संदर्भ:- १. शासन पत्र क्र. संकिर्ण-२०२३/प्र.क्र.१०५/एस.डी.४, दि.१९/०४/२०२४.

२. शिक्षण संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंमा-२४ (जे-०१)/ उन्हाळी सुट्टी/ एस.-१/२२०६, दिनांक १८/०४/२०२४.

३. शिक्षण संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं / ड-३०१/२०२४/३१८४, दिनांक १९/०४/२०२४.

उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्याने त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेतउ पस्थित राहण्यापासून सवलत देणे संदर्भात शासनाने संदर्भिय पत्र क्र. १ मधील मुद्दा क्र. १ नुसार राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २२/०४/२०२४ पासून शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत दिली आहे. संदर्भिय पत्र क्र. २ नुसार संचालनालयाने शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक ०२/०५/२०२४ पासून सुट्टी जाहीर केलेली आहे.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र विद्यार्थ्यांना शासनाने शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत दिलेल्या कालावधीतील कार्यदिनाकरीता नियमानुसार देय असणारा तांदुळ व धान्यादी माल कोरडा शिधा स्वरुपात वाटप करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरुन क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात यावेत. योजनेंतर्गत पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे.

प्रत माहितीस्तव सविनय सादर,

१. मा. सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.

२. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

३. मा. आयुक्त, महानगरपालिका, सर्व.

४. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.

प्रत - आवश्यक त्या कार्यवाहीस्तव-

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, विभाग सर्व.




Thursday, April 18, 2024

राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2024 ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरू करणे बाबत आजचे (१८ एप्रिल २०२४ परिपत्रक )

 ई-मेल- doesecondary1@gmail.com

फोन नं. ०२०-२६१२६४६३


महत्त्वाचे परिपत्रकक्रः.                               शिसंमा-24/(ओ-01)/उन्हाळी सुट्टी/एस-1/2206दि.18 एप्रिल, 2024.

प्रति

1. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.

2. शिक्षणाधिकारी (प्रार्यामक/माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व.

3. शिक्षण निरीक्षक (उत्तर/पश्चिम/दक्षिण), बृहन्मुंबई

विषय : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2024 ची उन्हाळी सुटटी व शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरु करणेबाबत.

संदर्भ: शासन परिपत्रक क्रःसंकिर्ण-2023/प्र.क्र. 105/एस.डी.4, दि. 20/04/2023.


उपरोक्त संदर्भीय परिपत्रकान्वये शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत. या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2024 ची उन्हाळी सुटटी व शेक्षणिक वर्ष 2024-25 सुरु करणेबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.


1. राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्याथ्यांना गुरुवार, दि.02 में, 2024 पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

2. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सूटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.

3. पुढील शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा शनिवार दि. 15 जून, 2024 रोजी सुरु करण्यात याव्यात.

4. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा 30 जून रोजी रविवार येत असल्याने सोमवार दि.01 जुलै, 2024 पासून सुरु करण्यात याव्यात.

वरील सूचना आपल्या अधिनस्थ सर्व मान्यता प्राप्त राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. 

(शरद गाँसावी)

शिक्षण संचालक

(प्रार्थामक शिक्षण संचालनालय) म.रा., पुणे.


( संपत सूर्यवंशी)

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय) म.रा., पुणे.

1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना माहितीस्तव सविनय सादर. 2. मा. आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय, मध्यवर्ती इमारत, पुणे-01 यांना माहितीस्तव सविनय सादर.




Wednesday, March 30, 2022

शासन निर्णय व परिपत्रक | राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जुलै, २०२१ पासून सुधारणा करण्याबाबत.

 


महाराष्ट्र शासन

दिनांक : ३० मार्च २०२२

शासन निर्णय

               राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

२. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जुलै, २०२१ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर २८% वरुन ३१% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२१ पासूनच्या थकबाकीसह माहे मार्च, २०२२ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.

3. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे. त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.

४. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची  टाकण्यात यावा.

Read And Download PDF File Click Here

Saturday, March 12, 2022

शासन निर्णय व परिपत्रक | शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही शैक्षणिक उपक्रम / प्रशिक्षणे/प्रकल्प / सर्वेक्षण आदी. कार्यक्रम न राबविणेबाबत...

 

महाराष्ट्र शासन 

(शालेय शिक्षण व क्रीडा विभाग)

दिनांक :- २४ फेब्रुवारी, २०२२.

प्रति,

१. जिल्हाधिकारी (सर्व),

२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व),

३. आयुक्त, महानगर पालिका (सर्व).

विषय :- शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही शैक्षणिक उपक्रम / प्रशिक्षणे/प्रकल्प / सर्वेक्षण आदी. कार्यक्रम न राबविणेबाबत...

संदर्भ :

१. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९.

२. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, २०११.

३. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दि. २९ जानेवारी २०१४.

४. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दि. २२ जून २०१५.

५. शासन परिपत्रक क्र. एसएसए २०१६/ प्र. क्र. ६/ एस डी १ दिनांक ०१/०१/२०१६.

६. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दि. १७ ऑक्टोबर २०१६.

७. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दि. ०८ जून २०१७.

८. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र जा. क्र. अशिका/ २०२० /प्रशिक्षण धोरण/ आस्था क्र. १४३ दिनांक ०९/०४/२०२०.

९. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दि. २८ एप्रिल २०२०.

१०. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०.

११. माहिती तंत्रज्ञान कायदा २०००.

१२. शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांचे यांच्या दि. २३ डिसेंबर २०२१ च्या मार्गदर्शक

सूचना

उपरोक्त संदर्भीय क्र. १ नुसार राज्यात सन २०१० पासून शिक्षण हक्क अधिनियम, २००९ अंमलात आला आहे. त्यानुसार राज्यातील १००% मुले शिकण्याच्या दृष्टीने इयत्ता १ ली ते ८ वी तसेच इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुलभ व्हावे या हेतूने शासन पातळीवर विविध निर्णय घेण्यात आले आहेत. जसे की, १- राज्यात उपरोक्त संदर्भीय क्र. १ व २ तील कलम २९ नुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे संस्थेस "विद्या प्राधिकरण” म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

Read And Download PDF File Click Here

Friday, March 4, 2022

शासन निर्णय व परिपत्रक | आधार क्रमांक आधारित संचमान्यतेबाबत...

महाराष्ट्र शासन 

(शालेय शिक्षण व क्रीडा विभाग)

दिनांक :- ४-३-२०२२

विषय :- आधार क्रमांक आधारित संचमान्यतेबाबत...

संदर्भ: १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग पत्र क्र. एसएसएन-२०२१/(प्र.क्र.७२/२१)/टीएनटी-२, दि. १४/०६/२०२१

२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग पत्र क्र. एसएसएन-२०२१/(प्र.क्र.२४२/२१)/टीएनटी-२, दि. ३०/१२/२०२१

३. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग पत्र क्र. एसएसएन-२०२१/(प्र.क्र.२४२/२१)/टीएनटी-२, दि. २८/०२/२०२२

                            शैक्षणिक वर्ष सन २०२१-२०२२ ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे करण्याचे शासनाने संदर्भिय पत्रान्वये निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार, राज्यातील सर्व शाळांची तात्पुरती (Interim) संचमान्यता दि. ३०/१२/२०२१ रोजीच्या आधार क्रमांक नोंद असलेल्या विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीस राज्यात आधार क्रमांक असलेली विद्यार्थी संख्या ८७% असून सर्व १००% विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.

विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक घेण्यास होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करणे योग्य होईल.

१. दि. ३०/१२/२०२१ रोजीच्या शाळेच्या पटावर नोंद असलेले परंतु सरल प्रणालीमध्ये आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांचे दि. ३१/०३/२०२२ पर्यंत आधार क्रमांक अपडेट झाल्यानंतर आधार क्रमांक नोंद केलेले विद्यार्थी संच मान्यतेकरीता ग्राहय धरण्यात यावेत..

२. डुप्लीकेट (Duplicate) आधार क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांचा डेटा (data) शाळास्तरावर दुरुस्त करण्याची कार्यवाही करावी व डुप्लीकेट (Duplicate) आधार क्रमांक राहणार नाहीत याची खात्री करावी.

३. नाव, लिंग किंवा जन्मतारीख जुळत नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा विद्यार्थ्यांची शाळेत असलेली नोंद व विद्यार्थ्याची प्रत्यक्ष शाळेत उपस्थित असल्याची खात्री करुन व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची शहानिशा करून असे विद्यार्थी संबंधित शाळेच्या संचमान्यतेकरीता ग्राह्य धरण्यात यावेत.

४. ज्या विद्यार्थ्याने आधार क्रमांकासाठी नोंदणी केली आहे परंतु अद्यापपर्यंत आधार क्रमांक मिळालेला नाही असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची शहानिशा करुन असे विद्यार्थी संचमान्यतेसाठी ग्राहय धरण्यात यावेत.

५. ज्या विद्यार्थ्याकडे आधार क्रमांक उपलब्ध नाही व त्याने आधार क्रमांकासाठी नोंदणी देखील केलेली नाही असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची शहानिशा करून असे विद्यार्थी संचमान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात यावेत. वरील क्र. १ ते ५ मध्ये दर्शविण्यात आल्यानुसार सर्व शाळांची पडताळणी समितीमार्फत करण्यात यावी.

६.

६.१ सदर पडताळणीकरीता संपूर्ण राज्यामध्ये पुढीलप्रमाणे पडताळणी समिती असेल.

1. शिक्षण विस्तार अधिकारी संबंधित बीट स्तर [समिती प्रमुख]

॥. केंद्र प्रमुख संबंधित केंद्र/ मनपा, नपा क्षेत्रातील प्रभाग अधिकारी / प्रशासन अधिकारी संबंधित कार्यक्षेत्र [सदस्य सचिव]

II. अंगणवाडी पर्यवेक्षिका संबंधित कार्यक्षेत्र [सदस्य]

IV. आरोग्य कर्मचारी संबंधित कार्यक्षेत्र [सदस्य]

६.२ वरील समितीने केंद्रातील प्रत्येक शाळेस समक्ष भेट देवून सर्व विद्यार्थ्यांची खात्री दि. ३१/०३/२०२२ पर्यंत करावी व या पत्रासोबतच्या नमुन्यात प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकारी / प्रभाग अधिकारी / प्रशासन अधिकारी यांचेकडे सादर करावे. त्याची एक प्रत केंद्र शाळेवर जतन करून ठेवावी.

६.३ सदरील प्रमाणपत्र व विहीत माहिती सरल पोर्टलवरील केंद्र प्रमुख यांच्या लॉगीनवरुन अपलोड/नोंद करण्याची सुविधा देण्यात येईल त्यावेळी अपलोड करावे.

६.४ गटशिक्षणाधिकारी / प्रभाग अधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी सरल पोर्टलवर पटाची खात्री दि. ०५/०४/२०२२ पर्यंत अंतिम करावी.

६.५ वरील प्रमाणे सुविधा ही केवळ शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ साठी लागू राहील.

७. संच मान्यता अंतिम झाल्यानंतर प्रचलित शासन निर्णय / परिपत्रकानुसार ऑफलाईन पद्धतीने समुपदेशन घेऊन अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन दि. ३१/०५/२०२२ पूर्वी करावे. 

आधार क्रमांक आधारित संचमान्यता  पूर्ण करण्या  करिता  प्रपत्र  डाऊनलोड  

प्रमाणपत्र

विध्यार्थी पडतळणी प्रपत्र १

विध्यार्थी पडतळणी प्रपत्र २

Read And Download PDF File Click Here

Tuesday, February 22, 2022

शासन निर्णय व परिपत्रक | महानगरपालिकामध्ये कार्यरत अधिकारी /कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत.

 

महाराष्ट्र शासन 

(शालेय शिक्षण व क्रीडा विभाग)

दिनांक :- २२ फेब्रुवारी, २०२२.

विषय :- महानगरपालिकामध्ये कार्यरत अधिकारी /कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत.

संदर्भ :- १) शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक: अनियो-१००५/१२६ सेवा ४, दिनांक ३१.१०.२००५

२) शासन निर्णय वित्त विभाग, क्रमांक: अंनियो १००५ ७/१८ / सेवा ४.दिनांक ०७.०७.२००७

३) शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक: अंनियो-२०१५/NPS/प्र.क्र ३२ / सेवा ४, दिनांक ०६.०४.२०१५

४) शासन पत्र क्र. संकिर्ण-२००७/प्र.क्र.११५/नवी-२० दिनांक २२.०९.२०१६.

५) शासन निर्णय वित्त विभाग, क्रमांक संकीर्ण-२०२०/प्र.क्र.५३/कोषा प्रशा- ४, दिनांक ०७.०१.२०२१.

प्रस्तावना :

१ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर शासकीय सेवेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना ऐवजी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) लागू केली आहे. सन २०१५ पासून DCPS योजना केंद्र शासनाच्या नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) मध्ये वर्ग केली आहे. परंतु महापालिका स्तरावर सदरील योजना राबवताना एकवाक्यता दिसून येत नाही. जसे काही महानगरपालिकांमध्ये कर्मचारी हिस्सा कपात केला जात नाही. तर काही महानगरपालिकांकडून केला जातो. तसेच दिनांक १९.०८.२०१९ च्या वित्त विभागाच्या आदेशान्वये सर्व कर्मचारी / अधिकारी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना नियुक्ता १४% अंशदान दिले जात नाही, काही महानगरपालिका शिक्षकांना नियुक्ता अंशदान केवळ ५% देतात, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) अंतर्गत कपात होते परंतु राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) मध्ये कर्मचाऱ्यांचे अद्याप खाते उघडण्यात आले नाही या संदर्भात सतत संबंधित शिक्षक / कर्मचाऱ्याकडून शासनाकडे विचारणा होत आहे. त्यामुळे महानगरपालिका कर्मचारी / अधिकारी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हितासाठी वित्त विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व महानगरपालिकांमध्ये यासंदर्भात एकवाक्यता असावी यासाठी शासन निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Read And Download PDF File Click Here