शासन निर्णय व परिपत्रक | सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत.

  

 महाराष्ट्र शासन 

(शालेय शिक्षण  व क्रीडा विभाग )

दिनांक  : २०-१२-२०२१

विषय :- सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत.

संदर्भ :- १. शासन निर्णय क्रमांक:- आरटीई २०१८/प्र.क्र.१८०/एस.डी.-१, दिनांक १८/०९/२०२०. २. शासन निर्णय क्रमकः- आरटीई-२०१९/प्र.क्र.११९/एस.डी.- १ दिनांक २५/०७/२०१९

उपरोक्त संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यातील जन्म असलेल्या बालकांच्या प्रवेशाबाबत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये अडचणी निर्माण होत आहे. म्हणून मानिव दिनांक बदलामुळे य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ साठी किमान वयोमर्यादा माहे ३१ डिसेंबर २०२२ अखेर पुढील प्रमाणे वय असणे आवश्यक आहे.

READ CIRCULAR 

परिपत्रक   डाऊनलोड करण्यासाठी 
इथे किलिक करा 


No comments:

Post a Comment

Thanks For Ur Comment