Pages

TET

Pavitra Portal & TAIT

CTET

Bridge Course 2023-2024

Bridge Course 2022-2023

Bridge Course 2021-22

Shalarth

MPSC & UPSC

WorkBook & Digest

Question Papers

Educational Information

5th & 8th Scholarship Exam

Speeches

Islamic Information

Maharashtra State

Educational Info

All About

११वी प्रवेश संदर्भात घेण्यात येणार्‍या सामाईक प्रवेश परीक्षा

राज्य मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षा सन 2021 साठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यासाठी इयत्ता अकरावी प्रवेश संदर्भात घेण्यात येणाऱ्या समाईक प्रवेश परीक्षेची आवेदन पत्रे सोमवार दिनांक 26-7-2021 रोजी दुपारी 3 वाजता पासून ऑनलाइन पद्धतीने


या संकेतस्थळावरून भरण्याची सुविधा पुनश्च उपलब्ध करून देण्यात येत आहे सदर सुविधा दिनांक 02-08-2021 अखेर ( रात्री 11:59) अखेर उपलब्ध असेल मंडळाच्या संकेत स्थळावर सीईटी पोर्टल एक्सेस करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे संगणक प्रणालीमध्ये आवेदनपत्र भरण्यासाठी खालील माहिती नोंदवावी लागणार आहे.

1) ई मेल आयडी (उपलब्ध असल्या)

2) पूर्वीच्या मोबाईल क्रमांक अध्यावत करणे किंवा नव्याने नोंदणी अनिवार्य आहे

3) परीक्षा माध्यम, विद्यार्थ्याने सेमी इंग्लिशचा विकल निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नासाठी इंग्रजी माध्यम असेल तथापि सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या विषयासाठी विद्यार्थ्यास एक माध्यम निश्चित करावे लागेल.

4) सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्यांचा तात्पुरत्या/ कायमच्या निवासस्थानाच्या पत्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका/ शहराच्या विभाग निश्चित करावे लागेल.

5) ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी चे आवेदन पत्र भरताना एस ई बी सी प्रवर्ग ची नोंद केली आहे अशा विद्यार्थ्यांना शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार खुला वर्ग अथवा ही डब्ल्यू एस हा प्रवर्ग निवडाव्या लागेल.

उपरोक्त प्रमाणे प्रथम आवश्यक माहिती निश्चित करून ठेवावी व नंतर इयत्ता अकरावी ची प्रवेशासाठी आयोजित समाईक प्रवेश परीक्षेचे आवेदन पत्र भांडण्याची कारवाई करावी.

दिनांक 22-07-2021 ते दिनांक 21-07-2021 या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून समाईक प्रवेश परीक्षा साठी मंडळाकडे अर्ज सादर केलेले आहेत त्यांना आपल्या अर्जाच्या तपशिल पूर्वीच्या अर्ज क्रमांक( एप्लीकेशन नंबर) व आवेदन पत्र भरताना नोंदविलेल्या मोबाईल क्रमांक टाकून उपरोक्त संकेतस्थळावर पाहता येईल सदर प्रक्रियेदरम्यान परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र प्रक्रिया पूर्ण करून शकलेल्या उमेदवारांच्या तपशील संकेतस्थळावर उपलब्ध नसल्यास त्यांनी नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता राहील.

सामाईक प्रवेश परीक्षा संदर्भात विद्यार्थी, पालक व अन्य संबंधित घटकांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी मंडळामार्फत यापूर्वी हेडलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचा तपशील मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राज्य मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र( इयत्ता दहावी) परीक्षा सन 2021 पूर्वी उत्तीर्ण/ प्रविष्ट झालेल्या विद्यार्थी आणि सीबीएसई आयसीएसई व अन्य मंडळाचे विद्यार्थ्यांनी त्यांना सामाईक प्रवेश परीक्षा साठी शुल्क भरावे लागणार आहे. यासाठी पेमेंट गेटवे ची सुविधा उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र करण्याची प्रक्रिया बुधवार दिनांक 28-07-2021 रोजी दुपारी 3 वाजता पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबत तपशील स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. तरी याबाबत संबंधित विद्यार्थी पालक व अन्य गटांनी याची नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment

Thanks For Ur Comment