शासन निर्णय व परिपत्रक | राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२ (National Science Day २०२२) च्या निमित्ताने शाळांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करणेबाबत.


 महाराष्ट्र शासन 

(शालेय शिक्षण  व क्रीडा विभाग )

दिनांक  : १७-२-२०२२

विषय   :- राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२ (National Science Day २०२२) च्या निमित्ताने शाळांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करणेबाबत.

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी सर सी. व्ही. रामन यांच्या रामन परिणाम या संशोधन कार्याबद्दल त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या अनुषंगाने देशभरात  राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२ साजरा करण्यासाठी यावर्षी शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा एकात्मिक दृष्टीकोन हा विषय निश्चित केला असून त्या अनुषंगाने विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयासंबंधित माहिती व समस्या याबाबत शास्त्रीय माहितीचा प्रसार करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, विज्ञान विषयाबाबत अभिरुची विकसित करणे या विविध हेतूने राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांचेसाठी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त स्तरनिहाय खालील शैक्षणिक कार्यक्रम ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने दि. २१ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत घेण्यात यावेत.

खालील तक्त्याप्रमाणे शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचेसाठी शैक्षणिक कार्यक्रमांचे इतर आयोजन करून आपल्या उपक्रमाचा/कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटापर्यंतचा सुस्पष्ट व्हिडिओ फोटो व साहित्य फेसबुक , इंस्टग्राम, वीटर इ. समाज संपर्क माध्यमांवर #scienceday 2022,#nationalscienceday2022 या हॅशटॅगचा वापर करून पोस्ट अपलोड करावी. आपण समाज संपर्क माध्यमांवर अपलोड केलेल्या पोस्ट https://scertmaha.ac.in/competitions/ या लिंकवर नोंदविण्यात यावी. उत्कृष्ट उपक्रमास राज्यस्तरावरून प्रसिद्धी देण्यात येईल.

सदर उपक्रमांचे आयोजन करताना कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सामाजिक अंतर राखणे आणि स्वच्छतेच्या आवश्यक त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी.

राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनांच्या शाळांमधील जास्तीत जास्त विद्यार्थी आणि शिक्षक यांनी वरील नमूद करण्यात आलेल्या ऑनलाईन/ ऑफलाईन पध्दतीने कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय अधिकारी, शाळा, शिक्षक, पालक यांना अवगत करण्यात यावे. अधिकाधिक विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये सहभागी होतील यासाठी आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी.

विध्यार्थी येथे  सहभाग  नोंदवावा 

Click Here

शिक्षकांनी  येथे   सहभाग  नोंदवावा 

Click Here

Read And Download PDF File Click Here

No comments:

Post a Comment

Thanks For Ur Comment