Pages

TET

Pavitra Portal & TAIT

CTET

Bridge Course 2023-2024

Bridge Course 2022-2023

Bridge Course 2021-22

Shalarth

MPSC & UPSC

WorkBook & Digest

Question Papers

Educational Information

5th & 8th Scholarship Exam

Speeches

Islamic Information

Maharashtra State

Educational Info

All About

शासन निर्णय व परिपत्रक | राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्याथ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२१-२२ इ. ८ वी साठी परीक्षा दि. १० एप्रिल २०२२ प्रसिध्दी निवेदनाबाबत

 महाराष्ट्र शासन 

(शालेय शिक्षण  व क्रीडा विभाग )

दिनांक  : १९-०१-२०२२

विषय :-   राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्याथ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२१-२२ इ. ८ वी साठी परीक्षा दि. १० एप्रिल २०२२ प्रसिध्दी निवेदनाबाबत

महोदय,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१ यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२१-२२ चे आयोजन इ. ८ वी मधील विद्याथ्र्यासाठी रविवार दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी करण्यात येणार आहे. त्यासंबंधी प्रसिध्दीपत्राची प्रत सोबत जोडलेली आहे. महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन तसेच लोकराज्य मासिकामधून या परीक्षेच्या प्रसिध्दी निवेदनास विनामूल्य प्रसिध्दी देण्यात यावी, अशी विनंती आहे.

प्रसिध्दी निवेदन

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा

(NMMS) २०२१-२२

सन २००७-०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्याचा शोध घेऊन बुध्दिमान विद्याथ्र्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या जनेचे उद्दिष्ट आहे. इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु.१,५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या विद्याथ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल.


१.अर्ज करण्याची पध्दत :

दिनांक १९/०१/२०२२ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.

२. पात्रता :

(a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.

b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न १,५०,०००/- पेक्षा कमी असावे, नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठयांचा सन २०२०-२१ च्या आर्थिक वर्षांचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा.

(c) विद्यार्थी/ विद्यार्थ्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (SC / ST चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)

(d) खालील विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी अपात्र आहेत.

·       विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी,

·        केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.

·       जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी

·        शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्याथी,

·        सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.

३. विद्यार्थ्यांची निवड :-

विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवगीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्याथ्र्यांची निवड करण्यात येईल.

४.परीक्षेचे वेळापत्रक :-

महाराष्ट्रातील विविध केंद्रावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचे मार्फत दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे. सदर परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.

विषयाचे नाव

 

एकूण

गुण

 

एकूण प्रश्न

 

कालावधी

 

वेळ

 

पात्रता गुण (एकत्रित)

 

बौद्धिक क्षमता चाचणी Mental Abilily Test

(MAT)

 

९०

 

९०

दीड तास (फक्त दृष्टी १०.३० ९०. ९० अपंगांसाठी ३० ते मिनिटे जादा वेळ)

१०.३० ते १२.००

 

४०%

 

विश्रांती १२.३० ते १३.३०

 

शालेय क्षमता चाचणी Scholastic Aptitude Test (SAT)

 

९०

९०

दीड तास (फक्त दृष्टी अपंगांसाठी ३० मिनिटे जादा वेळ)

 

१३.३० ते १५.००

 


* सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यासाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत. (SC, ST, व दिव्यांग विद्याथ्र्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)

५.परीक्षेसाठी विषय:- सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.

(a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT) :- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.

(b) शालेय क्षमता चाचणी (SAT) :- ही सामान्यतः इयत्ता ७ वी व इयत्ता ८ वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल, त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण (गुण ३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण -३५) ३. गणित (एकूण गुण २०) असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.

> उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.

a. सामान्य विज्ञान ३५ गुण: - भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण

b. समाजशास्त्र ३५ गुण इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण

c. गणित २० गुण

६. माध्यम:

प्रश्नपत्रिका मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू, सिंधी, कन्नड व तेलुगू या आठ माध्यमातून उपलब्ध असतील. (सर्व विद्यार्थ्यांना मूळमाध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येणार आहे.) यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे/ काळे बॉलपेनने पूर्णत: रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली/अपुरी/अशंत: रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली/उत्तरे/ चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/ व्हाईटनर / खाडाखोड करून नोंदविलेली किया गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत,

७.आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या:

अखिल भारतील पातळीवर NMMS शिष्यवृत्तींची संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी ११६८२ इतका कोटा निश्चित करून दिलेला आहे. कोटयानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार, गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. दिव्यांगासाठी (अपंगासाठी प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल. जिल्हयासाठीचा कोटा व विद्यार्थ्याच्या जातसंवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या प्रदान करण्यात येतील,

 शुल्क:- परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क आकारण्यात येते.

अ.क्र.

तपशील

दिनांक

शुल्क रु.

शाळा संलग्नता फी

 

ऑनलाईन नियमित आवेदनपत्रे भरणे

१९/०१/२०२२ ते १९/०२/२०२२

१००/-

संलग्लता फी रु.२००/- प्रति संस्था शैक्षणिक वर्षासाठी

 

 

ऑनलाईन विलंब आवेदनपत्रे भरणे

 

२०/०२/२०२२ ते २४/०२/२०२२

२००/-

 

 

ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्रे

(शाळा/संस्था जबाबदार असेल तर)

२५/०२/२०२२ ते २८/०२/२०२२

३००/-

४००/-

९. निकाल घोषित करणे :-

सदर परीक्षेचा निकाल साधारण जून २०२२ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवडयात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. जिल्हयांनी शाळांनी व विद्याथ्र्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढावयाचा आहे.

१०. शिष्यवृत्ती दर:-

शिष्यवत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास ३९ वी ते १२ वी पर्यंत दरमहा रु.१,०००/-( वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती दिली जाते. > शिष्यवृत्ती प्राप्त विद्याथ्र्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ.९ वी व इ. ११ वी मध्ये किमान ५५१%गुण मिळणे आवश्यक आहे (SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५०% गुणांची आवश्यकता आहे.) > इ. १० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहेत. (SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५५% गुणांची आवश्यकता आहे.) > सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.) यांचे मार्फत केले जाते.

११. अनधिकृततेबाबत इशारा

मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD), नवी दिल्ली/ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे शिवाय अन्य कोणत्याही संस्थेस या प्रकारची परीक्षा किंवा पूर्व परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे. शिष्यवृत्ती देणे या करिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेली नाही. अशा संस्थाबाबतची कोणतीही जबाबदारी मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD), नवी दिल्ली/ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेवर राहणार नाही.

No comments:

Post a Comment

Thanks For Ur Comment