Pages

TET

Pavitra Portal & TAIT

CTET

Bridge Course 2023-2024

Bridge Course 2022-2023

Bridge Course 2021-22

Shalarth

MPSC & UPSC

WorkBook & Digest

Question Papers

Educational Information

5th & 8th Scholarship Exam

Speeches

Islamic Information

Maharashtra State

Educational Info

All About

Pavitra Portal Important Notes for Candidates

 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना

दि २५/०६/२०२१


सध्या SEBC प्रवर्गात असलेल्या काही उमेदवारांना SEBC प्रवर्गातुन EWS प्रवर्गात बदल करण्यासाठी पासवर्ड रिसेट करताना OTP येत होती. सध्यस्थितीत OTP बाबतची अडचण दूर झालेली आहे , OTP ची अडचण आलेल्या उमेदवारांनी दि ३०/०६/२०२१ पर्यंत लॉगिन करून आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी.सदर मुदतीत बदल करणार नाहीत अशा उमेदवारांना सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दि ३१/५/२०२१ नुसार खुल्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात येईल.


दि १८/०६/२०२१


१ ) पवित्र पोर्टल मार्फत रयत शिक्षण संस्था, सातारा, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर व महात्मा फुले शिक्षण संस्था उरण, जि सांगली व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही जागांवरील नियुक्तीसाठी दि १४/५/२०२१ रोजी उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे. अशा सर्व उमेदवारांनी दि १५/०७/२०२१ पर्यंत संबंधित व्यवस्थापनाकडे संपर्क साधून आपली कागदपत्र पडताळणी करून घ्यावीत.

२ ) कागदपत्र पडताळणी अंती नियुक्तीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना संबंधित व्यवस्थापन नियुक्ती आदेश देतील.


दि ११/०६/२०२१


सध्या SEBC प्रवर्गात असलेल्या काही उमेदवारांना SEBC प्रवर्गातुन EWS प्रवर्गात बदल करण्यासाठी पासवर्ड रिसेट करताना OTP आवश्यक आहे, सर्वर वरील तांत्रिक अडचणीमुळे उमेदवारांच्या मोबाईल वर OTP येत नाही. ही बाब विचारात घेता OTP अडचण सुटे पर्यंत प्रवर्ग बदल करण्याची सुविधा पुढे चालु ठेवण्यात येत आहे. अशा उमेदवारांनी OTP आल्यानंतर लॉगीन करून आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी.


दिनांक:-०४/०६/२०२१


सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (SEBC) वर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांचा (EWS) लाभ देण्याबाबत.


१. . सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दि २३/१२/२०२० अन्वये या पूर्वी SEBC प्रवर्गातुन EWS प्रवर्गात बदल करण्याची ऐछिक सुविधा पवित्र पोर्टल वर देण्यात आलेली होती. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ३१/५/२०२१ नुसार आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) आरक्षणाच्या लाभासाठी पात्रतेच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या ज्या उमेदवारांना पोर्टल वर आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांचा (EWS) लाभ घ्यावयाच्या आहे त्यांना SEBC ऐवजी EWS करण्याची सुविधा देण्यात येत आहे.

२. वरील प्रमाणे बदल करण्यासाठी केवळ सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (SEBC) वर्गातील उमेदवारांनाच लॉगिन उपलब्ध होईल. तसेच यापूर्वी SEBC ऐवजी EWS असा प्रवर्ग बदल केलेल्या उमेदवारांना लॉगिन करून स्व प्रमाणपत्राची प्रिंट घेता येईल. अन्य प्रवर्गातील उमेदवारांना लॉगिन उपलब्ध होणार नाही.

३. सदर सुविधा दिनांक ०४.०६.२०२१ पासून दिनांक ११.०६.२०२१ पर्यंत सुरु राहील.

४. सदर सुविधा कालावधीत उमेदवाराने एकदा बदल केल्यास पुन्हा बदल करण्याची सुविधा दिली जाणार नाही. त्यामुळे उमेदवाराने स्वतःची खात्री करून प्रवर्ग बदल / लॉक करावा.

५. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ३१/५/२०२१ नुसार आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) आरक्षणाच्या निकषांची पूर्तता करीत असल्याबाबत नियुक्तीसाठी आर्थिकदृष्टया दुर्बल घटकाच्या पात्रतेचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक राहील. उमेदवारांनी असे प्रमाणपत्र दि ३१/०८/२०२१ पर्यंत प्राप्त करून घ्यावे.

६. जे उमेदवार विहित मुदतीत त्यांचा SEBC ऐवजी EWS असा प्रवर्ग बदल करणार नाहीत अशा उमेदवाराना खुल्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात येईल.

७. प्रवर्ग बदल करण्यासाठी फ्लो दर्शविणाऱ्या स्क्रीन शॉट पाहाव्यात.


दिनांक:-१४/०५/२०२१


तांत्रिक कारणास्तव शिफारस /निवड न झालेल्या उमेदवारांसाठी तसेच इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी या गटातील नियुक्तीसाठी अपात्र ,गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांच्या रिक्त जागांसाठी राउंड.


१. श्रीमती सोनम जोगदंड यांनी याचिका क्र ११२८५/२०१९ ,श्री यादव ठोंबरे यांनी याचिका क्र १११०८ /२०१९ मध्ये त्यांच्या अर्हतेचे विषय व आरक्षण विचारात घेऊन त्यांच्यापेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराची शिफारस/निवड झाल्यामुळे मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केलेल्या आहेत. तसेच श्रीमती श्रुतिका सव्वालाखे यांनी त्यांची शिफारस/निवड न झाल्याने मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे याचिका ७०५१/२०१९ दाखल केलेली आहे. उक्त दाखल याचिका तसेच अन्य याचिका प्रकरणी पुढील आवश्यक कार्यवाही करावयाची आहे. त्याचप्रमाणे विविध उमेदवारांची प्राप्त निवेदने विचारात घेऊन पवित्र पोर्टल मार्फत शिफारस/निवडीसाठी पात्र उमेदवारांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्याची कार्यवाही खालील प्रमाणे करण्यात येत आहे.

२. यापूर्वी पवित्र पोर्टल मार्फत शिफारस/निवडीसाठी प्रसिद्ध केलेल्या पात्र उमेदवारांच्या यादीच्या वेळी संबंधित प्रवर्गाचे आरक्षण व उपलब्ध विषय यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी (TAIT) परीक्षेत गुण असताना देखील काही उमेदवारांच्या डेटा मधील तांत्रिक अडचणीमुळे त्यांची नियुक्तीसाठी पोर्टल मार्फत शिफारस/निवड झालेली नाही. अशा उमेदवारांसाठी सदर राउंड घेण्यात आलेला आहे. या राउंड मध्ये गुणवत्तेनुसार उमेदवार त्या त्या वेळी शिफारस/निवडीसाठी पात्र ठरले असते, म्हणजेच विषय व आरक्षण विचारात घेता cutoff गुणांपेक्षा टेट परीक्षेत अधिक गुण असल्याने शिफारस/निवड होणे आवश्यक होते, अशा उमेदवारांचा विचार करण्यात आलेला आहे. यादीतील उमेदवारांनी कोविड-१९ च्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी संपर्क साधावा.

३. पवित्र पोर्टल मार्फत मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांतील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी या गटातील नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची दिनांक ७/२/२०२० रोजी यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर यादीतील उमेदवारांच्या नियुक्तीसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी उमेदवारांची पात्रता पडताळणी करून पात्र असणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती आदेश दिलेले आहेत. विहित मुदतीनंतर कागदपत्र पडताळणी मध्ये अपात्र ठरलेले,कागदपत्र पडताळणी साठी गैरहजर राहिलेले, नियुक्ती आदेश देऊनही विहित मुदतीत रुजू न झालेले उमेदवार अशा एकूण १९६ रिक्त जागांवर पवित्र पोर्टलमधील यादीतील गुणवत्तेनुसार उर्वरित पात्र उमेदवार संबंधित व्यवस्थापनाच्या मागणीनुसार उपलब्ध करून देण्यासाठी सदर राउंड घेण्यात आलेला आहे.

४. दिनांक ७/२/२०२० रोजी पवित्र पोर्टल मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील अपात्र,गैरहजर,रुजू न झालेले उमेदवार यामुळे यादीतील गुणवत्तेनुसार उर्वरित पात्र उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस/निवड करण्यासाठी शिल्लक आरक्षण, अपात्र,गैरहजर उमेदवार यांच्यामुळे उपलब्ध झालेले आरक्षण व उपलब्ध विषय विचारात घेण्यात आलेले आहेत .

५. इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी या गटातील नियुक्तीसाठी अपात्र,गैरहजर,रुजू न झालेले उमेदवार यांच्यासाठीचा राउंड घेतल्यानंतरही काही समांतर आरक्षण व विषय शिल्लक राहत असल्याने शिल्लक समांतर आरक्षण (माजी सैनिक व भूकंपग्रस्त वगळून) व उपलब्ध विषय विचारात घेऊन Converted Round घेण्यात आलेला आहे.

६. सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दि २३/१२/२०२० नुसार एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारानी ईडब्लूएस प्रवर्गात केलेला ऐच्छिक बदल विचारात घेऊन शिफारस पात्र उमेदवारांची शिफारस/निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

७. मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल याचिका क्रमांक २७१८/२०२० व अन्य दाखल याचिकांतील निर्णयाच्या अधीन राहून नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांची शिफारस/निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

८. मुलाखतीसह पदभरती बाबतच्या सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील.


दिनांक:-15/02/2021


याचिका क्रमांक ११०८१/२०१९ प्रकरणी समांतर आरक्षण राऊंड


1. मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्र.11081/2019 च्या दि.03/02/2020 व दि.02/03/2020 चे अंतरिम आदेशानुसार सदर निकाल प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच सदर निकाल मा.उच्च न्यायालयातील विविध याचिकांच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे.

2. पवित्र प्रणालीमार्फत पदभरती करताना ऑनलाइन पद्धतीने पोर्टलअंतर्गत इंटरनल राऊंड घेऊन अंतिम निवड यादी दि.09/08/2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. असे करताना इंटरनल राऊंड मध्ये (विषयानुसार समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे कन्व्हर्ट केलेला राऊंड) ज्या उमेदवारांची निवड त्यांच्या खालच्या पसंतीक्रमावर झालेली होती त्यांना त्यांच्या वरच्या पसंतीक्रमावर जागा मिळाल्यामुळे (बेटरमेंट) काही विषयाच्या जागा पुन्हा रिक्त झाल्या. या रिक्त जागा त्या त्या प्रवर्गातील समांतर आरक्षणाशिवाय खुल्यामध्ये कन्व्हर्ट झाल्या. असे करतेवेळी समांतर आरक्षणातील काही उमेदवार वगळले गेल्याचे निदर्शनास आले होते. मा.उच्च न्यायालयामध्ये यासंदर्भात याचिका दाखल केली गेली आहे.

3. उपलब्ध रोस्टर,उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम व विषयानुसार उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे समांतर आरक्षणातील जागा त्या त्या प्रवर्गातील खुल्यामध्ये कन्व्हर्ट केल्या नसत्या तर ज्या उमेदवारांची निवडीसाठी शिफारस झाली असती त्यांच्यासाठी हा निकाल आहे.

4. विषयानुसार उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे त्या त्या समांतर आरक्षणातील खुल्या मध्ये कन्व्हर्ट केलेल्या जागा त्या त्या समांतर आरक्षणामध्ये दर्शवून उमेदवारांची शिफारस पात्र यादी जाहीर करण्यात येत आहे.

5. उपरोक्त मुद्दा क्र.2 मध्ये नमूद केल्यानुसार समांतर आरक्षणातील जागा त्या त्या प्रवर्गातील खुल्यामध्ये कन्व्हर्ट केल्यामुळे उपलब्ध रोस्टर स्थितिनुसार आता शिफारसपात्र उमेदवारांच्या नियुक्तीसाठी पद उपलब्ध असेलच असे नाही. जेथे पद उपलब्ध होत नाही त्या उमेदवारांसाठी त्यांचा प्रवर्ग, विषय व इतर प्राधान्यक्रम विचारात घेऊन ज्या व्यवस्थापनाकडे जागा रिक्त आहे तेथे नियुक्ती देण्याबाबत शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे शिफारस झालेल्या सर्वच 35 उमेदवारांना सध्या नेमणूक देता येणार नाही. ज्या संस्थेमध्ये उपलब्ध रोस्टरनूसार पद आहे त्या ठिकाणी मात्र निवड झालेल्या पात्र उमेदवारांना त्या त्या व्यवस्थापनाकडून नेमणूक मिळेल. यातील 3 उमेदवारांबाबत मा. उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल. सद्यस्थितीत 32 उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे .

6. सदर निकाल हा दि.09/08/2019 च्या निकालाच्या स्थितीवर तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे या निकालात दि.07/02/2020 च्या राऊंड मध्ये निवडीसाठी शिफारस झालेल्या काही उमेदवारांचा समावेश आहे . तथापि या उमेदवारांना नव्याने शिफारस झालेल्या पदावर रुजू होण्याचा विकल्प राहील .

7. मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्र. 196/2020, 222/2020 446/2020 मधील दि.18/2/2020 रोजीच्या मा.न्यायालयाच्या आदेशानुसार याचिकाकर्त्यांना स्वतंत्रपणे कळविण्यात येत आहे.


दिनांक:-०८/०२/२०२१

 

बृहन्मुंबई महानगरपालिका पदभरती


१. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जाहिरातीनुसार दि. ०९/०८/२०१९ रोजी शिफारस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. मुंबई पब्लिक स्कुल (MPS) व प्राथमिक शिक्षण विभाग (UPS) या दोन प्रकारात उपलब्ध करून देण्याची मागणी विचारात घेता सदर उमेदवारांची दि. ०३/१२/२०१९ रोजी सुधारित शिफारस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . सदर यादीमध्ये तांत्रिक कारणास्तव मुंबई पब्लिक स्कुल (MPS) गटातील पदासाठी काही उमेदवारांचा समावेश झालेला नाही, असे निदर्शनास आल्यानंतर सदर मुंबई पब्लिक स्कुल (MPS) यादीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची शिफारसपात्र यादी मा. उच्च न्यायालयातील विविध याचिकांच्या अधिन राहून पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येत आहे .

२. यादीतील उमेदवारांनी शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका यांचेकडे नियुक्तीसाठी आवश्यक कागदपत्र पडताळणी व पुढील कार्यवाहीसाठी दि. १५/०२/२०२१ पर्यंत संपर्क साधावा.


दिनांक:-०७/१/२०२१


सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (SEBC) वर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांचा (EWS) लाभ देण्याबाबत


१. मा. सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुज्ञा याचिका क्र. १५७३७/२०१९ व इतर याचिकेवरील दि. ९/९/२०२० रोजी झालेल्या सुनावणीत सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (SEBC) वर्गातील आरक्षणास अंतरिम स्थागिती दिलेली आहे त्यामुळे मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र. ९४९३४/२०२० व अन्य याचिकेतील आदेशानुसार सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दि. २३/१२/२०२० मधील तरतुदीनुसार जे उमेदवार सद्यस्तिथीत सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (SEBC) प्रवर्गातील आहेत व ज्यांना आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांचा (EWS) लाभ घ्यावयाच्या आहे त्यांनी लॉगिन करून खालील सूचना नुसार आपला प्रवर्ग बदल करून घ्यावा.

२. सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (SEBC) वर्गातील उमेदवारांना खुल्या अथवा आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांचा (EWS) वर्गातील आरक्षणातून लाभ घेणे ऐच्छिक असेल.

३. उमेदवाराने सदर पदभरतीकरीता आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांचा (EWS) आरक्षणाचा लाभ घेतल्यास सदर उमेदवार सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (SEBC) आरक्षणाच्या लाभास पात्र ठरणार नाही.

४. वरील प्रमाणे बदल करण्यासाठी केवळ सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (SEBC) वर्गातील उमेदवारांनाच लॉगिन उपलब्ध होईल. अन्य प्रवर्गातील उमेदवारांना लॉगिन उपलब्ध होणार नाही.

५. सदर सुविधा दिनांक १४.०१.२०२१ पर्यंत सुरु राहील.

६. सदर सुविधा कालावधीत उमेदवाराने एकदा बदल केल्यास पुन्हा बदल करण्याची सुविधा दिली जाणार नाही. त्यामुळे उमेदवाराने स्वतःची खात्री करूनच प्रवर्ग बदल लॉक करावा.

७. प्रवर्ग बदल करण्यासाठी फ्लो दर्शविणाऱ्या स्क्रीन शॉट पाहाव्यात.


दिनांक:-०७/०९/२०२०


मुलाखतीसह पदभरतीसाठी प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत


१. खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त पदासाठी उच्च वयोमर्यादा लागू करण्यात आलेले होती त्यामुळे कमाल वय वयाधिक (Overage ) याकारणास्तव ज्या उमेदवारांना मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम देता आलेले नाहीत त्यांना महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) नियमावली १९८१ मधील तरतुदीनुसार दि ७/९/२०२० ते १७/९/२०२० या कालावधी मध्ये प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात येतील. सदर मुदतीत वयाधिक (Overage) याकारणास्तव प्राधान्यक्रम न दिलेल्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करावेत.

२. वरील क्र १ मधील ज्या उमेदवारांनी यापूर्वी मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केलेले नाहीत व आता नव्याने प्राधान्यक्रम देणार आहेत, त्यांना त्यांच्या समांतर आरक्षणाची (उदा. महिला, माजी सैनिक, अंशकालीन ,प्रकल्पग्रस्त,भूकंपग्रस्त,खेळाडू,अनाथ इ ) नोंद एकदाच करता येईल. त्यामुळे उमेदवारांनी एकदा माहिती save केल्यानंतर पुन्हा समांतर आरक्षण दुरुस्त करता येणार नसल्याने अशा उमेदवारांनी समांतर आरक्षण विषयक माहिती काळजीपूर्वक नोंद करावी. एकदा माहिती नोंद करून save करून येणाऱ्या फॉर्म वरील ok वर क्लिक केल्यानंतर पुन्हा माहितीमध्ये बदल करता येणार नाही.

३. ज्या उमेदवारांनी यापूर्वी जून २०१९ मध्ये मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत त्यांनी पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे अशा उमेदवारांना लॉगिन उपलब्ध होणार नाही.

४. प्राधान्यक्रम लॉक करताना काही अडचण येत असल्यास edupavitra@gmail.com वर ई-मेल करावा.


दिनांक:-२०/०८/२०२०


मुलाखतीसह पदभरतीसाठी प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत


१. मा उच्च न्यायालय खंडपिठ नागपूर येथील याचिका क्र ४०७९/२०१९ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार ज्या उमेदवारांना ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत त्यांना MEPS नियमानुसार खाजगी माध्यमिक शाळेसाठी उत्तीर्ण आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी किमान द्वितीय श्रेणी असणाऱ्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम द्यावयाचे आहेत.

२. ज्या उमेदवारांना यापूर्वी इ ११वी ते इ १२ वी या गटातील उच्च माध्यमिक पदासाठी ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत परंतु असे उमेदवार पदव्युतर पदवी किमान व्दितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असतील व पदव्युतर पदवी किमान व्दितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असल्याची नोंद पवित्र पोर्टल वर YES म्हणून केले आहे त्यांना मुलाखतीसह पदासाठीचे प्राधान्यक्रम देण्यात येत आहेत.

३. तसेच इ ९ वी ते इ १० वी या गटातील माध्यमिक पदासाठी पदवीस्तरावर उत्तीर्ण परंतु ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत अशा उमेदवाराकडून मुलाखतीसह पदासाठीचे प्राधान्यक्रम देण्यात येत आहेत.

४. खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त पदासाठी उच्च वयोमर्यादा लागू करण्यात आलेले होती त्यामुळे कमाल वय वयाधिक (Overage ) याकारणास्तव ज्या उमेदवारांना मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम देता आलेले नाहीत त्यांना महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) नियमावली १९८१ मधील तरतुदीनुसार प्राधान्यक्रम वर नमूद उमेदवारांनी प्राधान्यक्रम नोंद केल्यानंतर देण्यात येतील. प्राधान्यक्रम देण्याबाबत पोर्टलवर स्वतंत्र पणे सूचना देण्यात येतील.

५. वरील क्र २ ते ३ मधील उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करावयाचे आहेत.

६. वरील क्र २ ते ३ मधील ज्या उमेदवारांनी यापूर्वी मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केलेले नाहीत व आता नव्याने प्राधान्यक्रम देणार आहेत, त्यांना त्यांच्या समांतर आरक्षणाची (उदा. महिला, माजी सैनिक, अंशकालीन ,प्रकल्पग्रस्त,भूकंपग्रस्त,खेळाडू,अनाथ इ ) नोंद एकदाच करता येईल. त्यामुळे उमेदवारांनी एकदा माहिती save केल्यानंतर पुन्हा समांतर आरक्षण दुरुस्त करता येणार नसल्याने अशा उमेदवारांनी समांतर आरक्षण विषयक माहिती काळजीपूर्वक नोंद करावी. एकदा माहिती नोंद करून save करून येणाऱ्या फॉर्म वरील ok वर क्लिक केल्यानंतर पुन्हा माहितीमध्ये बदल करता येणार नाही.

७. ज्या उमेदवारांनी यापूर्वी जून २०१९ मध्ये मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत त्यांनी पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे अशा उमेदवारांना लॉगिन उपलब्ध होणार नाही.

८. वरील क्र २ ते ३ मधील उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्याचा शेवटचा दिनांक ३१/८/२०२० आहे.

९. प्राधान्यक्रम लॉक करताना काही अडचण येत असल्यास edupavitra@gmail.com वर ई-मेल करावा.


दिनांक:-०४/०८/२०२०


पवित्र पोर्टलवरील शिक्षक पदभरती बाबतची सद्यस्थिती


१. पवित्र प्रणालीअंतर्गत दि ०९/८/२०१९ रोजी शिफारस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेची सुधारित यादी दि ३/१२/२०१९, उर्दू माध्यमातील रिक्त पदांची यादी दि.२७/१२/२०१९ व मा उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिकेतील आदेशानुसार मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी संस्थातील इ. ९ वी ते इ. १० वी, इ.११ वी ते इ. १२ वी या गटातील सुधारित यादी दि. ७/२/२०२० रोजी प्रसिद्ध केलेली आहे.

२. पवित्र प्रणालीअंतर्गत मा. उच्च न्यायालयातील याचिकेतील आदेशानुसार समांतर आरक्षणातील पात्र उमेदवारांची शिफारस यादी, दि ९/८/२०१९, दि ०३/१२/२०१९ व दि.०७/०२/२०२० रोजी यादी प्रसिद्ध केल्यानंतर विषयनिहाय,प्रवर्गनिहाय रिक्त राहिलेल्या पदासाठी व यादीतील अपात्र,गैरहजर, रुजू न झालेले उमेदवारांच्या रिक्त राहिलेल्या पदासाठी पात्र उमेदवाराची शिफारस यादी तयार करणे, मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या खाजगी संस्थातील पदासाठी मुलाखतीस पात्र उमेदवारांची शिफारस यादी तयार करणे प्रस्तावित आहे,

३. पवित्र प्रणालीअंतर्गत यापूर्वी नियुक्तीबाबत केलेल्या शिफारशीच्या विरोधात व शासनाच्या धोरणात्मक बाबींच्या विरोधात विविध विषयावर मा . उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झालेल्या आहेत. त्यातील याचिका क्र २९५६/२०१९ मध्ये दि १४/५/२०२० रोजी मा. उच्च न्यायालयाने आदेश देऊन ब्रिज कोर्स उत्तीर्ण असण्याची अट रद्ध ठरविली आहे. मा. न्यायालयाचा सदरचा आदेश शासनाच्या प्रचलित कार्यपद्धतीशी विसंगत असल्याने विधिज्ञाचे मत घेऊन कार्यवाही करण्यात येत आहे.

४. मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह शिक्षक पदभरतीबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यापूर्वी दि. २३/३/२०२० रोजीच्या सूचनेनुसार सूचित करण्यात आलेले होते. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक परिस्थितीमुळे शासनाच्या दि ४/५/२०२० च्या शासन निर्णयानुसार पवित्र प्रणालीअंतर्गत पद भरतीसाठीची कार्यवाही स्थगित ठेवली आहे. तथापि पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्याची परवानगी देण्याबाबत शासनास विनंती करण्यात आलेली आहे.

५. मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथील याचिका क्र ४०७९/२०१९ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळातील उच्च माध्यमिक पदाकरीता पदव्युतर पदवी साठी किमान व्दितीय श्रेणी व माध्यमिक पदांकरीता पदवीसाठी किमान उत्तीर्ण श्रेणी आवश्यक ठरविली आहे. यापूर्वी अशा उमेदवारांना प्राधान्यक्रम उपलब्ध होत नव्हते. मा . उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा मुलाखतीशिवाय पदभरतीसाठीच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम उपलब्ध करून देऊन दि ०७/२/२०२० रोजी सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच प्रमाणे मुलाखतीसह पदभरतीची परवानगी शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. तथापि त्यापूर्वी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्याबाबत सुविधा देण्यात येईल.

No comments:

Post a Comment

Thanks For Ur Comment